
चालू घडामोडी | भारतीय लष्कराचे हवाई संरक्षण धोरण : MANPADS चा नवा वापर

Indian Army's Air Defence Strategy : New Use of MANPADS
Subject : GS - संरक्षण (Defence)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) MANPADS (Man-Portable Air Defence Systems) प्रामुख्याने कशासाठी वापरली जाते ?
1. पाणबुडीविरोधी हल्ल्यासाठी
2. उपग्रह नष्ट करण्यासाठी
3. लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी
4. कमी उंचीवर उडणारी विमाने, हेलिकॉप्टर व ड्रोन पाडण्यासाठी
उत्तर : कमी उंचीवर उडणारी विमाने, हेलिकॉप्टर व ड्रोन पाडण्यासाठी
बातमी काय ?
• Indian Army आपल्या हवाई संरक्षण धोरणात बदल करत असून, MANPADS प्रणालीचा वापर सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा (Sub-Sonic Cruise Missiles) धोका रोखण्यासाठी अधिक प्रभावीपणे करत आहे.

MANPADS म्हणजे काय ?
• MANPADS म्हणजे Man-Portable Air Defence Systems.
• ही अशी जमिनीवरून हवेत मार करणारी क्षेपणास्त्रे आहेत जी एक सैनिक किंवा लहान तुकडी सहज वापरू शकते.
• ही प्रणाली प्रामुख्याने खांद्यावरून डागली जाणारी हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे म्हणून ओळखली जाते.
MANPADS ची रचना व क्षमता :
• याची लांबी साधारणत 2 मीटरपेक्षा कमी असते.
• वजन सुमारे 10 ते 20 किलो असते.
• कमी उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यांसाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.
• सुमारे 8 किमी अंतर आणि सुमारे 4.5 किमी उंची पर्यंत प्रभावी मारा करण्याची क्षमता MANPADS ची असते.
MANPADS कोणत्या लक्ष्यांविरुद्ध प्रभावी आहेत ?
• हेलिकॉप्टर
• ड्रोन
• कमी उंचीवर उडणारी विमाने
• सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे (Sub-Sonic Cruise Missiles)
➡️ म्हणूनच भारतीय लष्कर या प्रणालीचा वापर नव्या धोक्यांवर केंद्रित करत आहे.
MANPADS चा इतिहास व जागतिक वापर :
• 1960 च्या दशकात अमेरिका (Redeye) आणि सोव्हिएत संघ (Strela) यांनी प्रथम MANPADS तैनात केले.
• आज जगातील सुमारे 105 देश MANPADS वापरतात.
• मात्र फक्त 12 देश MANPADS या प्रणालीचे उत्पादन करतात.
• भारत हा MANPADS उत्पादन करणाऱ्या 12 देशांपैकी एक आहे.















