
चालू घडामोडी | CITES ला 50 वर्षे पूर्ण

50th anniversary of the CITES
Subject : GS - पर्यावरण, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) CITES च्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 20वे Conference of Parties (CoP20) अधिवेशन कुठे पार पडले ?
1. नैरोबी, केनिया
2. समरकंद, उझबेकिस्तान
3. जिनिव्हा, स्वित्झर्लंड
4. नवी दिल्ली, भारत
उत्तर : समरकंद, उझबेकिस्तान (Samarkand, Uzbekistan)
बातमी काय ?
• वन्य प्राणी व वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार असलेल्या CITES ने आपला 50 वा वर्धापनदिन उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या 20व्या पक्ष परिषदेत (CoP20) साजरा केला.
🐘 CITES म्हणजे काय ?
• CITES चा फूल फॅार्म Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora असा आहे.
• CITES म्हणजे वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन
• CITES हा जंगली प्राणी व वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणारा आंतरराष्ट्रीय करार आहे.
• या कराराचा उद्देश असा आहे की व्यापारामुळे कोणत्याही प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ नये.
• हा करार कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असून सदस्य देशांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
CITES ची पार्श्वभूमी (History) :
• या कराराची संकल्पना IUCN ने 1963 मध्ये मांडली.
• कराराचा अंतिम मसुदा 1973 मध्ये वॉशिंग्टन (अमेरिका) येथे तयार झाला.
• CITES 1 जुलै 1975 पासून अंमलात आला.
• 2025 पर्यंत CITES चे 185 सदस्य देश असून, हा जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय करारांपैकी एक आहे.
CITES चे प्रमुख कार्य :
• वन्य प्राणी व वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी परवाना व प्रमाणपत्र प्रणाली राबवणे.
• नामशेष होण्याच्या धोक्यानुसार प्रजातींचे Appendices मध्ये वर्गीकरण करणे.
• प्रजातींच्या संरक्षणासाठी Appendix I, II आणि III अशा तीन यादींमधून व्यापारावर वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्बंध घातले जातात.
• बेकायदेशीर वन्यजीव व्यापाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय अंमलबजावणी समन्वय साधणे.
• शाश्वत वापर, वैज्ञानिक मूल्यमापन आणि देशांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे.
CITES CoP20 (2025) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• CoP (Conference of Parties) हे CITES चे निर्णय घेणारे सर्वोच्च अधिवेशन आहे.
• हे अधिवेशन साधारणपणे दर 2–3 वर्षांनी आयोजित केले जाते.
• आयोजक: CoP20 चे यजमानपद उझबेकिस्तान यांनी भूषवले असून, मध्य आशियातील हे पहिलेच CITES अधिवेशन ठरले.
• या अधिवेशनातून CITES च्या 50 वर्षांचा प्रवास अधोरेखित झाला.
CoP20 मधील प्रमुख निर्णय :
Major Outcomes from CoP20 :
• 77 नवीन प्रजाती CITES च्या Appendices मध्ये समाविष्ट करण्यात आल्या.
• शार्क व रे माशांच्या अनेक प्रजाती -(Oceanic Whitetip Shark, Whale Shark, सर्व Manta व Devil Rays) Appendix I मध्ये टाकण्यात आल्या.
• गॅलापागोस भू-इग्वाना (Galápagos Land Iguanas) च्या 3 प्रजाती व सागरी इग्वाना (Marine Iguana) Appendix I मध्ये समाविष्ट करण्यात आले.
• आफ्रिकेतील काही दुर्मिळ सरपटणाऱ्या प्रजातींना उच्च संरक्षण देण्यात आले.
संरक्षण यशामुळे काही प्रजातींची यादी बदल :
• सायगा हरिण (कझाकस्तान) : संरक्षणात सुधारणा झाल्यामुळे Appendix II मधून काही प्रमाणात सवलत.
• Guadalupe फर सील (मेक्सिको) : Appendix I मधून Appendix II मध्ये स्थलांतर.
CoP20 परिषदेतील भारताची भूमिका :
India’s Role at CoP20 :
• भारताने ने युरोपियन युनियन च्या गुग्गुळ (Commiphora Wightii) या वनस्पतीला Appendix II मध्ये टाकण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.
• वैज्ञानिक मूल्यमापन अपूर्ण असल्याचे कारण देत भारताचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.













