
चालू घडामोडी | संसदेत शांती विधेयक सादर

SHANTI Bill introduced in Parliament
Subject : GS - राज्यशास्त्र - कायदे
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संसदेत ‘शांती विधेयक’ (SHANTI Bill) मांडण्यात आले तर ते मुख्यतः कशाशी संबंधित आहे ?
1. देशातील ऊर्जा पारेषण (Transmission) क्षेत्रातील खासगीकरण
2. देशातील कोळसा आधारित वीज प्रकल्पांचे राष्ट्रीयीकरण
3. देशातील अण्वस्त्र साठवण व संरक्षण धोरण
4. देशातील नागरी अणुऊर्जा क्षेत्राचे आधुनिकीकरण, नियमन आणि विस्तार
उत्तर : नागरी अणुऊर्जा क्षेत्राचे आधुनिकीकरण, नियमन आणि विस्तार
बातमी काय ?
• संसदेत ‘शांती विधेयक’ (SHANTI Bill) सादर करण्यात आले.
• ही 1962 नंतरची भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी सुधारणा मानली जात आहे.
SHANTI Bill म्हणजे काय ?
• SHANTI Bill हा भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रासाठी आणलेला समग्र सुधारणा विधेयक आहे.
• SHANTI Bill चा फूल फॅार्म Sustainable Harnessing and Advancement of Nuclear Energy for Transforming India (SHANTI) Bill, 2025 असा आहे.
• मुख्य उद्देश : सध्या अस्तित्वात असलेल्या विखुरलेल्या आणि जुन्या कायद्यांऐवजी आधुनिक, स्पष्ट आणि एकसंध कायदेशीर चौकट उभी करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
• अणुऊर्जा प्रशासन, सुरक्षितता, जबाबदारी (Liability) आणि उद्योग सहभाग या सर्व बाबी या विधेयकात समाविष्ट आहेत.
हे विधेयक कोणी मांडले ?
• हे विधेयक Department of Atomic Energy (DAE) यांनी मांडले आहे.
• अणुऊर्जा विभाग थेट पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.
• या विधेयकाअंतर्गत स्वतंत्र अणु-सुरक्षा प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे.
सध्याचे अणुऊर्जा कायदे कोणते आहेत ?
• सध्या भारतात अणुऊर्जा क्षेत्र खालील दोन कायद्यांद्वारे नियंत्रित आहे -
1) अणुऊर्जा कायदा, 1962 (Atomic Energy Act, 1962) आणि
2) अणुऊर्जा नुकसानीसाठी नागरी जबाबदारी कायदा, 2010 (Civil Liability for Nuclear Damage Act, 2010)
या कायद्यांमुळे -
• खासगी क्षेत्राचा सहभाग मर्यादित राहिला आहे
• जबाबदारी (liability) संदर्भात अस्पष्टता निर्माण झाली आहे
SHANTI Bill चे मुख्य उद्दिष्ट कोणते ?
• भारतात मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जा विस्तार करणे.
• देशी व विदेशी खासगी गुंतवणूक आकर्षित करणे.
• अणुऊर्जा नियमन आणि सुरक्षितता व्यवस्था आधुनिक करणे.
• 2047 पर्यंत 100 GW अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य साध्य करणे.














