
चालू घडामोडी | सरदार वल्लभभाई पटेल

Sardar Vallabhbhai Patel
देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना मानवंदना 🙏💐💐
Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली ?
1. महात्मा गांधींनी
2. बारडोलीतील महिलांनी
3. ब्रिटनच्या राणीने
4. गुरूजी रविंद्रनाथ टागोर यांनी
उत्तर : बारडोलीतील महिलांनी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जन्म : त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला.
• सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री होते.
• मृत्यू : 15 डिसेंबर 1950 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
• आधुनिक अखिल भारतीय सेवा प्रणालीची (Modern All-India Services System) स्थापना केल्यामुळे त्यांना ‘भारताच्या नागरी सेवांचे संरक्षक संत’ (Patron Saint of India’s Civil Servants) म्हणूनही स्मरणात ठेवले जाते.
• भारतरत्न पुरस्कार : 1991 मध्ये मरणोत्तर त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• विमानतळ : अहमदाबाद येथील विमानतळाला सरदार वल्लभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला ?
• 2014 मध्ये, भारत सरकारने अधिकृतपणे 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून घोषित केला.
• सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठीच्या वचनबद्धतेचा सन्मान करणे आणि त्यांचे हे विचार देशाच्या नागरीकांच्या मनात बिंबवने हा या मागचा उद्देश आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे आहे ?
• 2018 मध्ये, भारत सरकारने सरदार पटेल यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे अनावरण केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान :
• त्यांनी खेडा सत्याग्रह (1918) आणि बारडोली सत्याग्रह (1928) मध्ये शेतकऱ्यांचा संघर्ष राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीशी जोडला.
• 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहादरम्यान (प्रार्थना आणि उपोषण आंदोलन) सरदार पटेल यांनी तीन महिने तुरुंगवास भोगला.
• मार्च 1931 मध्ये सरदार पटेल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची अधिवेशनाचे (46 वे अधिवेशन) अध्यक्षपद भूषविले.
• 1942 मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली ?
• 1928 मध्ये बारडोली सत्याग्रह, हे गुजरात मधील बारडोली येथील शेतकऱ्यांनी अन्यायकारक कर वाढवण्याच्या विरोधात केलेले आंदोलन होते.
• या आंदोलनाचे नेतृत्व वल्लभभाई पटेल यांनी केले.
• बारडोलीच्या महिलांनी वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ ही पदवी दिली.














