
चालू घडामोडी | विजय दिवस

Vijay Diwas
विजय दिवसानिमित्त शूर सैनिकांना अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1971 च्या युद्धात भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी खालील पैकी कोणता दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो ?
1. 16 डिसेंबर
2. 16 जुलै
3. 31 डिसेंबर
4. 7 मे
उत्तर : 16 डिसेंबर
बातमी काय ?
• दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो.
16 डिसेंबर रोजी विजय दिवस का साजरी करतात ?
• 1971 च्या भारत-पाक युद्धातील भारताच्या विजयाचे स्मरण म्हणून 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करतात.
• हा दिवस आपल्याला 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देतो.
• हे युद्ध 13 दिवस चालले आणि पाकिस्तानने 93,000 सैनिकांसह आत्मसमर्पण केल्याने त्याचा शेवट झाला.
• या युद्धामुळे बांगलादेश मुक्त झाला.
• 16 डिसेंबर हा दिवस भारताचे लष्करी सामर्थ्य, न्यायप्रति वचनबद्धता आणि मानवतावादी मूल्यांवर प्रकाश टाकणारा आहे.
भारत - पाकिस्तान 1971 चे युद्ध का झाले ?
• युद्धाची सुरुवात 26 मार्च 1971 रोजी पाकिस्तान कडून झाली.
• या दिवशी पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले.
• त्यामुळे लाखो बांगलादेशी भारतात पळून गेले.
• मुख्यतः बांगलादेशच्या सर्वात जवळची राज्ये पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांमध्ये.
• बांगलादेशातील या निर्वासितांची संख्या या राज्यांत वाढू लागली.
• भारताने अन्न आणि निवारा देऊन या निर्वासितांची मदत केली.
• 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या 11 तळांना लक्ष्य करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले.
• बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्ती वाहिनी सैन्य आणि भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला.
• 16 डिसेंबर 1971 रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्य दलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली.
• 16 डिसेंबर 1971 रोजी बांग्लादेश 🇧🇩 स्वतंत्र झाला.
1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते ?
• श्रीमती इंदिरा गांधी या 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधान होत्या.
1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कर प्रमुख कोण होते ?
• फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कर प्रमुख होते.
कारगिल विजय दिवस केव्हा असतो ?
• कारगिल विजय दिवस : 26 जुलै रोजी असतो.
• लडाख येथील कारगिल जिल्ह्यात 1999 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले.
• 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानचा पराभव करून कारगिल युद्ध जिंकले.













