
चालू घडामोडी | "हरिमाऊ शक्ती – 2025" हा संयुक्त लष्करी सराव

“Exercise Harimau Shakti -2025”
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारत आणि मलेशिया यांच्यात “हरिमाऊ शक्ती – 2025” हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे ?
1. पहांग, मलेशिया
2. महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान
3. डेहराडून, उत्तराखंड
4. पुणे, महाराष्ट्र
उत्तर : महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान
बातमी काय ?
• अलिकडेच, भारत आणि मलेशिया यांच्यातील पाचवा संयुक्त लष्करी सराव “हरिमाऊ शक्ती – 2025” पार पडला.
• या सरावाचा मुख्य उद्देश दहशतवादविरोधी कारवायांमध्ये परस्पर समन्वय आणि कार्यक्षमता वाढवणे हा आहे.
हरिमाऊ शक्ती 2025 या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
• एक वर्ष भारत तर पुढच्या वर्षी मलेशिया अशा पद्धतीने या लष्करी सरावाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
• 2025 या वर्षीचा हरिमाऊ शक्ती सराव राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आला.
हरिमाऊ शक्ती या सरावात सहभागी तुकड्या कोणत्या ?
• भारतीय तुकडी : डोग्रा रेजिमेंट (Dogra Regiment)
• मलेशियन तुकडी : 25वी बटालियन, रॉयल मलेशियन आर्मी (Royal Malaysian Army)

हरिमाऊ शक्ती 2025 सरावाचे मुख्य उद्दिष्टे कोणती ?
• दहशतवादविरोधी कारवायांमध्ये संयुक्त प्रतिसादांचा समन्वय साधणे
• दोन्ही देशांच्या सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमता (Interoperability) वाढवणे
• जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान कमी करणे
हरिमाऊ शक्ती 2025 सरावातील प्रमुख लष्करी कृती :
• घेराबंदी, शोध आणि नष्ट मोहिमा (Cordon & Search Operations)
• हेलिबोर्न ऑपरेशन्स (Heliborne Operations)
• हेलिपॅड सुरक्षित ठेवण्याचा सराव
• अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचा (Casualty Evacuation) सराव
हरिमाऊ शक्ती 2025 या सरावाचे महत्त्व :
• भारत आणि मलेशिया यांच्यातील संरक्षण सहकार्य मजबूत होईल.
• संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता राखण्याच्या कारवायांसाठी तयारी.
• दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.
हरिमाऊ शक्ती – 2025 (Short Notes)
• सरावाचा प्रकार : भारत–मलेशिया संयुक्त लष्करी सराव
• सरावाची आवृत्ती : पाचवी (5th Edition)
• कालावधी : 5 ते 18 डिसेंबर 2025
• ठिकाण : महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान
भारताबरोबर चे लष्करी युद्ध सराव :
• भारत आणि मलेशिया : हरिमाऊ शक्ती
• भारत आणि सिंगापूर : बोल्ड कुरुक्षेत्र, अग्नी वॉरियर
• भारत आणि अमेरिका : वज्र प्रहार, युद्ध अभ्यास
• भारत आणि इंडोनेशिया : गरुड शक्ती
• भारत आणि श्रीलंका : मित्र शक्ती
• भारत आणि नेपाळ : सूर्य किरण
• भारत आणि चीन : हॅंड-इन-हॅंड
• भारत आणि रशिया : इंद्र














