
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 2025

International Migrants Day 2025
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 2 डिसेंबर
2. 18 डिसेंबर
3. 25 डिसेंबर
4. 9 जानेवारी
उत्तर : 18 डिसेंबर
आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवसाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर प्रश्न- उत्तरे :
• दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 18 डिसेंबर रोजी साजरी करतात.
• या दिसाला आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस म्हणूनही ओळखले जाते.
आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 18 डिसेंबर लाच का साजरी करतात ?
• 18 डिसेंबर 1990 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने सर्व स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला.
• या कराराचे महत्व लक्षात घेता जगभरात 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरी करण्यात येतो.
पहिला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?
• 18 डिसेंबर 2000 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरी करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस का साजरी करतात ?
• स्थलांतरित लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे
• त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे,
• त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे.
• स्थलांतरितांच्या योगदानाचे महत्त्व आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी
आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
What is the theme of International Migrants Day 2025 ?
• “माझी महान कथा : संस्कृती आणि विकास”
• (My Great Story : Cultures and Development)
• ही आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 2025 ची संकल्पना (थीम) आहे.
• ही थीम मानवी स्थलांतरामुळे समाज, संस्कृती आणि विकासाला मिळणाऱ्या योगदानावर प्रकाश टाकते.
• स्थलांतरामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते, समाज अधिक समावेशक बनतो आणि जागतिक विकासाला चालना मिळते.
( नोट : 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. )













