
चालू घडामोडी | चऱाईचुंग महोत्सव

Charaichung Festival
Subject : GS - पर्यावरण, भूगोल
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच माजुली बेटावर आयोजित ‘चऱाईचुंग महोत्सव’चा मुख्य उद्देश काय ?
1. येथिल अभयारण्याचे पुनरुज्जीवन करणे
2. माजुलीतील भातशेतीला चालना देणे
3. नव-वैष्णव संप्रदायाचा प्रसार करणे
4. माजुलीला औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करणे
उत्तर : येथिल अभयारण्याचे पुनरुज्जीवन करणे
बातमी काय ?
• आसाममधील माजुली बेट (Majuli Island) येथील जवळपास निष्क्रिय झालेल्या चऱाईचुंग रॉयल बर्ड सॅंक्च्युरीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी चऱाईचुंग महोत्सव दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आला आहे.

चऱाईचुंग महोत्सव म्हणजे काय ?
• चऱाईचुंग महोत्सव हा आशियातील पहिल्या संरक्षित रॉयल बर्ड सॅंक्च्युरीच्या 392 वर्षांच्या वारशाची आठवण करून देतो.
• 1633 साली अहोम राजा स्वर्गदेव प्रताप सिंहा (Ahom king Swargadeu Pratap Singha) यांनी चऱाईचुंग अभयारण्याची स्थापना केली होती.
चऱाईचुंग महोत्सवाचे उद्दिष्ट व वैशिष्ट्ये :
• चऱाईचुंग पक्षी अभयारण्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देणे.
• माजुलीतील पक्षी अधिवास व जैवविविधतेचे संरक्षण.
• वनसंवर्धनावर आधारित विशेष प्रदर्शने, ज्यातून निसर्गसंरक्षणासाठीचे प्रयत्न दाखवले जातात.
• स्थानिक लोकांचा सहभाग आणि सामूहिक जबाबदारी अधोरेखित करणे.
जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली बेट कोणत्या नदीवर वसलेले आहे ?
(सरळसेवा भरती, Maha TET 2018, RRB Group D 2022, RPF Constable 2018, महाराष्ट्र पोलिस भरती 2017,....)
• माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीतील बेट असून ते आसाममध्ये आहे.
• माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे.
• 2016 मध्ये माजुलीला भारताचे पहिले नदी-बेट जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली.
• हे बेट निसर्गसौंदर्य, पाणवठे, हिरवीगार शेती आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे.
• भातशेती हा येथील मुख्य उपजीविकेचा स्रोत आहे.














