
चालू घडामोडी | 🇮🇳🤝🌏 भारत–एशियन डेव्हलपमेंट बँक अंदाजे ₹19,800 करोड़ कर्ज करार

India–ADB ₹19,800 Crore Loan Agreements
Subject : GS - अर्थशास्त्र, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे भारताने एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत (ADB) सुमारे $2.2 अब्ज कर्ज करार कोणत्या उद्देशासाठी केले आहेत ?
1. संरक्षण आधुनिकीकरणासाठी
2. कृषी निर्यात वाढीसाठी
3. मानव संसाधन विकास, स्वच्छ ऊर्जा, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी
4. फक्त बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी
उत्तर : मानव संसाधन विकास, स्वच्छ ऊर्जा, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी
बातमी काय ?
• भारत आणि Asian Development Bank यांच्यात $2.2 अब्जांहून अधिक (अंदाजे ₹19,800 करोड़) रकमेचे कर्ज करार करण्यात आले असून, त्यातून देशातील पाच मोठ्या विकास प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
हे करार नेमके कशासाठी आहेत ?
• हे कर्ज विविध क्षेत्रांतील विकासाला गती देण्यासाठी देण्यात आले आहे.
• यामध्ये कौशल्य विकास, सौर ऊर्जा, आरोग्य सेवा, शहरी वाहतूक आणि शाश्वत उपजीविका यांचा समावेश आहे.
• लोकांचे जीवनमान सुधारणे आणि समावेशक आर्थिक विकास साधणे हा यामागील उद्देश आहे.
$2.2 अब्ज (अंदाजे ₹19,800 करोड़) कर्ज पॅकेजची प्रमुख क्षेत्रनिहाय माहिती :
कौशल्य विकास व रोजगार :
• निधी - $846 दशलक्ष (अंदाजे ₹ 7,614 करोड़)
• 12 राज्यांतील 650 ITI संस्थांचे आधुनिकीकरण.
• 5 राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण.
• रोजगार - सुमारे 1.3 दशलक्ष युवकांच्या रोजगारक्षमतेत वाढ, विशेषतः नवीकरणीय ऊर्जा व इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात.
रूफटॉप सोलर ऊर्जा :
• निधी - $650 दशलक्ष (अंदाजे ₹ 5,850 करोड़)
• PM सूर्य घर : मुफ्त बिजली योजना अंतर्गत मदत.
• 2027 पर्यंत 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य.
• स्वस्त व तारणमुक्त कर्ज आणि क्षेत्रीय सुधारणा यावर भर.
आरोग्य सेवा विस्तार :
• निधी - $398.8 दशलक्ष ( अंदाजे ₹ 3,589 करोड़)
• गुवाहाटी, दिब्रूगड आणि सिलचर येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उन्नतीकरण.
• ही महाविद्यालये उत्कृष्टतेची केंद्रे (Centres of Excellence) म्हणून विकसित केली जाणार.
शहरी वाहतूक :
• निधी - $240 दशलक्ष (अंदाजे ₹ 2,160 करोड़)
• चेन्नई मेट्रो रेल प्रकल्प – टप्पा 2 साठी कर्ज.
• नवीन मार्ग व स्थानके, हवामान-संवेदनशील (climate-resilient) रचना आणि सर्वसमावेशक प्रवेश सुविधा.
शाश्वत उपजीविका :
• निधी - $77 दशलक्ष ( अंदाजे 693 करोड़)
• मेघालयातील इको-टुरिझम व हवामान-स्मार्ट शेती प्रकल्प.
• स्थानिक व आदिवासी समुदायांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरण संवर्धन.
एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) म्हणजे काय ?
• ADB ही आशिया–प्रशांत क्षेत्रासाठी काम करणारी बहुपक्षीय विकास बँक आहे.
• उद्देश : गरीबी निर्मूलन, समावेशक व शाश्वत विकासाला चालना देणे.
एशियन डेव्हलपमेंट बँक बद्दल परीक्षेसाठी IMP पॉईंट्स :
• स्थापना : 19 डिसेंबर 1966
• मुख्यालय : मनीला, फिलिपिन्स (Manila, Philippines)
• सदस्य देश : 69 (50 प्रादेशिक + 19 अप्रादेशिक)
• भारत : संस्थापक सदस्य देश (1966)

एशियन डेव्हलपमेंट बँक ची प्रमुख कार्ये कोणती ?
• शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, वाहतूक आणि हवामान कृतीवर विशेष लक्ष देणे त्यासाठी मदत करणे.
• सरकार व खासगी क्षेत्राला कर्ज, अनुदान व तांत्रिक मदत देणे.














