
चालू घडामोडी | गोवा मुक्ती दिन
Goa Liberation Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीपासून गोवा मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी खालील पैकी कोणता दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरी करतात ?
1. 19 डिसेंबर
2. 25 डिसेंबर
3. 31 डिसेंबर
4. 1 जानेवारी
उत्तर : 19 डिसेंबर
बातमी काय ?
• पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीपासून गोवा मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.
• गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांच्या धैर्याचे आणि अतुलनीय योगदानाचे या दिवशी स्मरण करतात.
गोवा पोर्तुगीजांनी कधी काबीज केला ?
• 1510 मध्ये गव्हर्नर अफोंसो डी अल्बुकर्क याने विजापूरच्या आदिलशाहाकडून गोवा जिंकले.
• येथूनच अल्बुकर्कने भारतात पोर्तुगीज सत्ता वाढविण्यास सुरुवात केली.
• अल्बुकर्क हा भारतातील पोर्तुगीज सत्तेचा पहिला गव्हर्नर जनरल होता.

गोवा मुक्ती आंदोलन :
• डॉ. राम मनोहर लोहिया आणि लुईस डी मिनेझिस ब्रागांसा यांसारख्या नेत्यांनी वसाहतवादी धोरणांवर टीका केली.
• डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात अनेक सभा, मोर्चे, आंदोलने काढण्यात आली.
• 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळताच भारताने पोर्तुगीजांना गोवा आणि दीव-दमणचा प्रदेश भारताकडे सोपवण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला.

सैन्य कारवाई - ऑपरेशन विजय :
• 1961 पर्यंत पोर्तुगीजांसोबतचे राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, 18 डिसेंबर रोजी भारत सरकारने ऑपरेशन विजय सुरू केले.
• ऑपरेशन विजयच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी फक्त 36 तासांच्या आत गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त केले.
• या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे कामगिरी केली.
• 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारताचा भाग बनला आणि पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला.
गोवा राज्य स्थापना दिन केव्हा असतो ?
(Statehood Day of Goa)
• पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाल्यावर गोवा, दीव आणि दमणला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले.
• 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्या.
• 30 मे 1987 रोजी गोवा हे भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले.
• तर दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश राहिले.
• त्यामुळे 30 मे गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात.
गोवा राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• गोवा मुक्ती दिन : 19 डिसेंबर
• गोवा राज्य स्थापना दिन : 30 मे
• राजधानी : पणजी
• राजभाषा (अधिकृत भाषा) : कोंकणी (Konkani)
• गोव्याला पूर्वेकडील रोम म्हणून ही ओळखले जाते.
• राज्यपाल : पुसापती अशोक गजपती राजू (Pusapati Ashok Gajapathi Raju)
• मुख्यमंत्री : श्री प्रमोद सावंत (Shri Pramod Sawant)














