
चालू घडामोडी | ‘एकाथा’ 2025 संयुक्त सागरी सराव

Exercise Ekatha 2025
Subject : GS - युद्ध अभ्यास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘एकाथा’ हा संयुक्त सागरी सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो ?
1. भारत – मालदीव
2. भारत – श्रीलंका
3. भारत – बांगलादेश
4. भारत – सेशेल्स
उत्तर : भारत – मालदीव
बातमी काय ?
• भारतीय नौदलाचे उप-नौदल प्रमुख (Deputy Chief of the Naval Staff - DCNS) मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर असून, तेथे आयोजित भारत–मालदीव संयुक्त सागरी सराव ‘एकाथा 2025’च्या समारोप समारंभात सहभागी झाले.

‘एकाथा’ सराव म्हणजे काय ?
• ‘एकाथा’ हा भारतीय नौदल आणि मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स (MNDF) यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव आहे.
• पहिला सराव : या सरावाची सुरुवात 2017 साली करण्यात आली.
• उद्देश : दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य आणि समन्वय वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
• ‘एकाथा 2025’ ही या सरावाची 8वी आवृत्ती होती.
‘एकाथा’ सरावाचे प्रमुख उद्दिष्ट :
• सागरी आणि किनारी भागातील (Littoral) संयुक्त कारवायांमध्ये कार्यक्षम समन्वय साधणे.
• प्रादेशिक सागरी सुरक्षेशी संबंधित सामायिक आव्हानांना तोंड देण्याची क्षमता वाढवणे.
• दोन्ही नौदलांमधील व्यावसायिक समज आणि परस्पर विश्वास बळकट करणे.
‘एकाथा’ सरावाचे धोरणात्मक महत्त्व :
• हा सराव भारताच्या MAHASAGAR (Mutual and Holistic Advancement for Security and Growth for All in the Region) या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
• तसेच भारताच्या ‘शेजारी प्रथम' (‘Neighbourhood First’ Policy) या मोहिमेला बळकटी देतो.
• हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा व स्थैर्य वाढवण्यासाठी हा सराव महत्त्वाचा मानला जातो.















