
चालू घडामोडी 31, मार्च 2025 | राजस्थान स्थापना दिन

राजस्थान स्थापना दिन | Rajasthan Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, भूगोल - पर्यटन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राजस्थान राज्य स्थापना दिन केव्हा असतो ?
1. 21 जानेवारी
2. 30 मार्च
3. 1 एप्रिल
4. 1 मे
उत्तर : 30 मार्च
राजस्थान राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• दरवर्षी 30 मार्च रोजी राजस्थान राज्य स्थापना दिन साजरा केला जातो.
• राजस्थानची अधिकृत स्थापना 30 मार्च 1949 रोजी झाली.
• देशात आणि जगात राजस्थानला वीरांची भूमी म्हणूनही ओळखले जाते.
• राजस्थानला राजांची भूमी (Land of Kings) म्हणूनही ओळखले जाते.
• पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, राणा सांगा, राणा कुंभ यांसारख्या योद्ध्यांचा आणि वीरांचा इतिहास राजस्थानने जतन केला आहे.
• हळदी खोऱ्यातील लढाया, चित्तोड, खानवा, तराईन आणि रणथंभोरच्या लढाया राजस्थानच्या भूमीवर लढल्या गेल्या.
• राजस्थान आपल्या ऐतिहासिक किल्ले, राजवाडे, कला आणि संस्कृतीसाठी पर्यटकांना आकर्षित करते.
• लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते.
राजस्थानचे जुने नाव काय आहे ?
• राजपुताना हे राजस्थान राज्याचे जुने नाव आहे.
• स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश राजवटीत हा प्रदेश राजपुताना म्हणून ओळखला जात असे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, रेल्वे, MPSC, NTPC 2016)
• क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे.
राजस्थानची राजधानी कोणती ?
• जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे.
• जयपूर या शहराला गुलाबी शहर (Pink City) म्हणूनही ओळखले जाते.
• महाराजा सवाई जयसिंग द्वितीय (Maharaja Sawai Jai Singh II) यांनी 18 नोव्हेंबर 1727 रोजी जयपूर शहराची स्थापना केली.
भारतातील कोणत्या शहराला सुवर्णनगरी (Golden City) म्हणतात ?
• राजस्थानातील जैसलमेर या शहराला भारतातील सुवर्णनगरी म्हणतात.
सिंधू संस्कृतीचे प्राचीन कालीबंगा (Kalibangan) स्थळ भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
• कालीबंगा हे राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात घग्गर नदीच्या काठावर आहे.
• कालीबंगा हे नाव काली आणि बांगन या दोन शब्दांपासून बनले आहे.
• कालीबंगा (काळी बांगडी) : काली म्हणजे काळा आणि बंगा म्हणजे बांगडी.

घुमर कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, रेल्वे)
• घुमर नृत्य हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे, जे विशेषतः महिला सादर करतात.

केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
(सरळसेवा भरती, वनरक्षक भरती, रेल्वे, MPSC, NTPC 2021)
• केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्यात आहे.
• केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमधील भरतपूर येथे स्थित एक पाणथळ जागा आणि पक्षी अभयारण्य आहे.
• केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रामसर स्थळ (पाणथळ क्षेत्र) आहे.
• केवलादेव राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांच्या प्रजातींसाठी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.