
चालू घडामोडी 29, मार्च 2025 | एबेल पुरस्कार | Abel Prize

एबेल पुरस्कार
Abel Prize
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जपानच्या मसाकी काशीवारा यांना 2025 चा एबेल पुरस्कार देण्यात आला. हा एबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट वैज्ञानिक कार्यासाठी दिला जातो ?
1. रसायनशास्त्र
2. भौतिकशास्त्रज्ञ
3. अर्थशास्त्र
4. गणित
उत्तर : गणित
बातमी काय ?
• जपानी गणितज्ञ मसाकी काशीवारा (Masaki Kashiwara) यांना यावर्षीचा एबेल पुरस्कार देण्यात आला.

मसाकी काशीवारा यांना एबेल पुरस्कार का देण्यात आला ?
• मसाकी काशीवरा यांना बीजगणितीय विश्लेषण (Algebraic Analysis) आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील (Representation Theory) त्यांच्या मूलभूत योगदानाबद्दल, विशेषतः डी-मॉड्यूलच्या (D-modules) सिद्धांताचा विकास आणि क्रिस्टल बेसच्या (Crystal Bases) शोधासाठी सन्मानित करण्यात आले.
• मसाकी काशीवरा यांच्या कार्यामुळे बऱ्याच काळापासून असलेल्या काही गणितातील कठीण समस्या सोडवण्यास मदत झाली. त्याचबरोबर संशोधनासाठी नवीन मार्गही उघडले आहेत.
एबेल पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
एबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो ?
• नॉर्वे देशाचे गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल (Niels Henrik Abel) यांच्या नावावरून एबेल पुरस्कार नॉर्वे देशाकडून दिला जातो.
• हा पुरस्कार पहिल्यांदा 2003 मध्ये देण्यात आला.
• एबेल पुरस्काराला गणितातील नोबेल पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते.
एबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
एबेल पुरस्कार कोणाला दिला जातो ?
• एबेल पुरस्कार हा गणितातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
• गणित क्षेत्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या असाधारण गणितज्ञांना आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे या पुरस्काराचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
एबेल पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय कोण ?
• एस. आर. श्रीनिवास वर्धन (SR Srinivasa Varadhan) हे एबेल पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय आहेत.
• एस. आर. श्रीनिवास वर्धन यांना 2007 मध्ये एबेल पुरस्कार मिळाला.
