
चालू घडामोडी 27, मार्च 2025 | 21 वी पशुधन गणना | 21st Livestock Census

21वी पशुधन गणना
21st Livestock Census
Subject : GS - अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पशुधन गणनेबद्दल योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
1. देशातील पहिली पशुगणना 1919-1920 मध्ये करण्यात आली.
2. दर 10 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
3. वरील दोन्ही विधाने योग्य आहेत.
4. वरील दोन्ही विधाने अयोग्य आहेत.
उत्तर : देशातील पहिली पशुगणना 1919-1920 मध्ये करण्यात आली.
दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
बातमी काय आहे ?
• देशभरात 21 वी पशुधन गणना 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस.पी. सिंह बघेल यांनी 25 मार्च 2025 रोजी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
• 25 ऑक्टोबर 2024 रोजी देशभरात 21 वी पशुधन गणना सुरू करण्यात आली.
देशात पशुगणना कोण करते ?
• केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय संबंधित राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभागाच्या भागीदारीत पशुधन गणना करतात.
देशात पहिली पशुधन गणना केव्हा करण्यात आली ?
• देशातील पहिली पशुगणना 1919-1920 मध्ये करण्यात आली.
• तेव्हापासून दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
पशुधन गणना किती वर्षांनी केली जाते ?
• दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते.
• आतापर्यंत 20 पशुधन गणना झाल्या आहेत. यंदाची ही 21 वी पशुधन गणना आहे.
• 20वी पशुधन गणना 2019 मध्ये देशभरात करण्यात आली.
पशुधन गणनेचा फायदा काय ?
• या जनगणनेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील 16 प्रजातींच्या पशुधनाची लोकसंख्या, जाती, लिंग, वय आणि वापर यांचा तपशील देण्यात येईल.
• यामुळे संपूर्ण भारतातील पशुधनाच्या लोकसंख्येची माहिती गोळा करण्यात मदत होईल.
• हा डेटा पशुधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कार्यक्रमांचे योग्य नियोजन, सूत्रीकरण, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यात सरकारला मदत करेल.
• या गणनेमुळे सरकारला या क्षेत्राच्या विकासासाठी आणि पशु आरोग्य संरक्षणासाठी योग्य धोरणे आखण्यास मदत होईल.