
चालू घडामोडी 27, मार्च 2025 | ऑनलाइन मनी गेमिंगवर कडक कारवाई | Strict action against online Money Gaming

ऑनलाइन मनी गेमिंगवर कडक कारवाई
Strict action against online Money Gaming
Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'ऑनलाइन मनी गेमिंग' वर GST अंतर्गत किती टक्के कर आकारला जातो ?
1. 5 %
2. 12 %
3. 18 %
4. 28 %
उत्तर : 28 %
बातमी काय आहे ?
• वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने (Directorate General of Goods and Services Tax Intelligence - (DGGI)) परदेशातून कार्यरत असलेल्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांविरुद्धच्या अंमलबजावणीच्या कारवाई अधिक तीव्र केल्या आहेत.
• ऑनलाइन मनी गेमिंग उद्योगात देशांतर्गत आणि परदेशी अश्या दोन्ही ऑपरेटर्सचा समावेश आहे.
कोणती कारवाई करण्यात आली ?
• भारतात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
• GST गुप्तचर अधिकाऱ्यांनी परदेशातून कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या 357 वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत.
• सुमारे 2000 बँक खाती देखील जप्त करण्यात आली आहेत.
• 122.05 कोटी रुपयांची रक्कम तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
• आतापर्यंत तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर कारवाई का करण्यात आली ?
• करपात्र पे-इन लपवणे.
• कर दायित्वांना टाळणे (GST ची चोरी करणे).
• बनावट बँक खात्यांद्वारे व्यवहार करणे.
• तसेच या कंपन्यांनी कुठलीही नोंदणी केली नव्हती.
कायदा काय सांगतो ?
• या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना/कंपन्यांना GST अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.
• GST कायद्यांतर्गत, 'ऑनलाइन मनी गेमिंग', कारवाईयोग्य दावा/क्लेम समजला जात असल्याने, 'वस्तूंचा' पुरवठा म्हणून त्याचे वर्गीकरण होते.
• वस्तु म्हणून वर्गीकरण झाल्याने त्यावर 28% कर आकारला जातो.