
चालू घडामोडी 26, मार्च 2025 | 2025 कबड्डी वर्ल्डकप कोणी जिंकला ? | Who won the 2025 Kabaddi World Cup ?

2025 कबड्डी वर्ल्डकप कोणी जिंकला ?
Who won the 2025 Kabaddi World Cup ?
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कबड्डी वर्ल्डकप 2025 बद्दल योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) कबड्डी वर्ल्डकप 2025 भारतात आयोजित करण्यात आला.
ब) भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटात हा कबड्डी वर्ल्डकप जिंकला.
पर्याय :
1. फक्त अ योग्य
2. फक्त ब योग्य
3. अ आणि ब दोन्ही योग्य
4. अ आणि ब दोन्ही अयोग्य
उत्तर : फक्त ब योग्य
कबड्डी वर्ल्डकप 2025 हा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला.
बातमी काय आहे ?
इंग्लंडमधील वुल्व्हरहॅम्प्टन येथे झालेल्या पुरुष आणि महिला कबड्डी विश्वचषक 2025 मध्ये भारताने जेतेपद पटकावले.
कबड्डी वर्ल्डकप 2025 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 17 ते 23 मार्च 2025 रोजी इंग्लंडमध्ये कबड्डी विश्वचषक 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
• यंदाची (2025) ही दुसरी कबड्डी वर्ल्डकप स्पर्धा आहे.
• कबड्डी वर्ल्डकप पहिल्यांदाच आशिया बाहेर आयोजित केली जात आहे.
पुरुष कबड्डी वर्ल्डकप 2025 स्पर्धा कोणी जिंकली ?
पुरुष संघाने अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचा 44-41 असा पराभव केला.
विजेता संघ : भारत
उपविजेता संघ : इंग्लंड
महिला कबड्डी वर्ल्डकप 2025 स्पर्धा कोणी जिंकली ?
भारतीय महिला संघाने त्याच ठिकाणी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 57-34 अशा दमदार गुणांनी पराभूत केले.
विजेता संघ : भारत
उपविजेता संघ : इंग्लंड
पहिला कबड्डी वर्ल्डकप कोणी जिंकला ?
• पहिला कबड्डी वर्ल्डकप 2019 मध्ये मलेशियात आयोजित करण्यात आला होता.
• भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटात पहिला कबड्डी वर्ल्डकप जिंकला होता.