
चालू घडामोडी 27, मार्च 2025 | भारताचे नवीन वित्त सचिव कोण ? | Who is India's new Finance Secretary ?

भारताचे नवीन वित्त सचिव कोण ?
Who is India's new Finance secretary ?
Subject : GS - नियुक्ती, अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारने मार्च 2025 रोजी नवीन वित्त सचिव (finance secretary) म्हणून कोणाची नियुक्ती केली ?
1. श्री अजय सेठ
2. श्री राजीव कुमार
3. श्री अनुराग गर्ग
4. श्री तुहिन कांता पांडे
उत्तर : श्री अजय सेठ (Ajay Seth)

बातमी काय आहे ?
• केंद्र सरकारने 24 मार्च 2025 रोजी श्री. अजय सेठ यांची नवीन वित्त सचिव (Finance Secretary) म्हणून नियुक्ती केली.
• मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
• मार्च 2025 मध्ये श्री तुहिन कांता पांडे यांची SEBI (Securities and Exchange Board of India) चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून वित्त सचिव पद रिक्त होते.
• श्री अजय सेठ हे माजी वित्त सचिव श्री तुहिन कांता पांडे यांची जागा घेतील.
• अर्थ मंत्रालयातील प्रचलित परंपरेनुसार, विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या सचिवांपैकी सर्वात वरिष्ठ व्यक्तीला वित्त सचिव म्हणून नियुक्त केले जाते.
श्री अजय सेठ यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री अजय सेठ हे 1987 च्या कर्नाटक केडर बॅचचे IAS अधिकारी आहेत.
• त्यांना सार्वजनिक वित्त, कर आकारणी आणि सामाजिक क्षेत्रातील प्रशासनात 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे.
• श्री अजय सेठ यांना 2013 मध्ये पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• कर्नाटकातील व्यावसायिक कर प्रशासनाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.