
चालू घडामोडी 29, मार्च 2025 | नीति आयोग | NITI Aayog

नीति आयोग
NITI Aayog
Subject : GS - नियुक्ती, आयोग
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच नीति (NITI) आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1. अंजू राठी राणा
2. राजीव गौबा
3. तुहिन कांता पांडे
4. अरविंद पनगढिया
उत्तर : राजीव गौबा (Rajiv Gauba)
बातमी काय आहे ?
माजी कॅबिनेट सचिव श्री. राजीव गौबा यांची नीति आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री राजीव गौबा यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री राजीव गौबा हे एक अनुभवी अधिकारी आहेत. त्यांना धोरणनिर्मिती आणि प्रशासनाचा मोठा अनुभव आहे.
• त्यांनी भारत सरकारमध्ये अनेक उच्च पदांवर काम केले आहे.
• धोरण तयार करणे आणि अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
• श्री. राजीव गौबा 1982 च्या बॅचचे झारखंड केडरचे IAS अधिकारी आहेत.
• ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2024 पर्यंत भारत सरकारचे कॅबिनेट सचिव (Cabinet Secretary, Government of India) म्हणून काम पाहिले.
• झारखंड राज्याचे मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
नीति आयोगा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
NITI Aayog National Institution for Transforming India
नीति आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 1 जानेवारी 2015 रोजी नीति आयोगाची स्थापना करण्यात आली.
• नीति आयोग ही संस्था भारत सरकारची थिंक टॅंक (Think -Tank) म्हणून स्थापन झाली.
• नीति आयोगाची स्थापना एक असंवैधानिक आणि अवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.
नीति आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
नीति आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
नीति आयोगाचे प्रमुख कार्य :
• देशाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणे आणि त्यासाठी धोरणे आखणे.
• नीति आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे.
• नीति आयोग केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणात्मक बाबींवर सल्ला देते.
• 1 जानेवारी 2015 पासून नियोजन आयोगाची (Planning commission) जागा नीति आयोग या नवीन संस्थेने घेतली.
नीति आयोगाचे विस्तारित रूप काय ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : भंडारा चालक 2021)
उत्तर : नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मरमिंग इंडिया (National Institution for Transforming India)
भारताच्या नीति आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
(महाराष्ट्र पोलीस भरती : मुंबई 2018)
• पंतप्रधान हे नीति आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
• नीति आयोगाचे वर्तमान अध्यक्ष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत.