
चालू चाडमोडी 28, मार्च 2025 | BHIM 3.0 App
BHIM 3.0 ॲप | BHIM 3.0 app
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ------ रोजी भीम (BHIM) अॅप लाँच केले.
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, SSC 2019)
1. 15 ऑगस्ट 2016
2. 31 ऑक्टोबर 2016
3. 26 जानेवारी 2016
4. 30 डिसेंबर 2016
उत्तर : 30 डिसेंबर 2016
बातमी काय आहे ?
• नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची उपकंपनी NPCI BHIM सर्व्हिसेस लिमिटेड (NBSL) ने भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) 3.0 ॲप लाँच केले आहे.
BHIM युनिफाइड पेमेंट इंटरफेस केव्हा आणि का सुरू करण्यात आला ?
• BHIM चा फूल फॅार्म Bharat Interface for Money असा आहे.
• UPI तंत्रज्ञानाचा वापर करून कॅशलेस पेमेंटसाठी एक सोपा, जलद आणि सुरक्षित मार्ग प्रदान करण्यासाठी BHIM युनिफाइड पेमेंट इंटरफेस (BHIM Unified Payment Interface (UPI)) 2016 मध्ये सुरू करण्यात आला.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2016 रोजी भीम (BHIM) अॅप लाँच केले.
• यामुळे वापरकर्त्यांना बँक खात्याच्या तपशीलांची आवश्यकता नसतानाही मोबाइल फोनद्वारे त्वरित पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे (send and receive money) शक्य झाले.
BHIM 3.0 च्या प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ?
• BHIM 3.0 मध्ये 15 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे
• कमी इंटरनेट स्पीड असलेल्या भागात पेमेंट करण्यास मदत करेल.
• व्यवहारांसाठी सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुरक्षितता वाढवली आहे.
• BHIM 3.0 सह वापरकर्त्याचा UPI कुटुंबातील इतर सदस्यांना देखील खात्यात जोडता येते.
• वापरकर्ते त्यांच्या मासिक खर्चाचा मागोवा त्याच्या डॅशबोर्डवर घेऊ शकतात आणि केलेले सर्व खर्च वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभाजित करू शकता.
• BHIM Vega व्यापाऱ्यांसाठी लाँच करण्यात आले आहे.
• BHIM Vega हे एक इन-ॲप पेमेंट सोल्यूशन आहे.
• BHIM Vega हे ॲप वापरकर्त्यांना कोणत्याही थर्ड पार्टी ॲपवर स्विच न करता ऑनलाइन व्यापारी प्लॅटफॉर्मवर थेट पेमेंट करण्याची परवानगी देते.
NPCI बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• NPCI चा फूल फॅार्म National Payments Corporation of India असा आहे.
• NPCI ला भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम असेही म्हणतात.
भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI) ची स्थापना केव्हा आणि कोणी केली ?
• पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायदा, 2007 (Payment and Settlement Systems Act, 2007) अंतर्गत, RBI आणि इंडियन बँक्स असोसिएशनने 2008 मध्ये NPCI ची स्थापना केली.
• भारतातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी NPCI ची स्थापना करण्यात आली.