
चालू घडामोडी 28, मार्च 2025 | INS Tavasya | ‘तवस्या’ युद्धनौका

‘तवस्या’ युद्धनौका
INS Tavasya
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) तवस्या युद्धनौकेची निर्मिती कोणी केली ?
1. गोवा शिपयार्ड लिमिटेड
2. कोचीन शिपयार्ड
3. लार्सन अँड टुब्रो (L&T) शिपयार्ड
4. माझगाव डॉकयार्ड लिमिटेड
उत्तर : गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited)
बातमी काय आहे ?
• भारतीय नौदलाने गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) येथे स्टेल्थ फ्रिगेट ‘तवस्या’ लाँच केले.
काय आहे तवस्या ?
• ‘तवस्या’ ही आधुनिक युद्धनौका असून पृष्ठभागावरील, पाणबुडी आणि हवाई युद्ध मोहिमांसाठी डिझाइन केलेली आहे.
• तवस्या युद्धनौका हे "प्रोजेक्ट 1135.6 फॉलो-ऑन फ्रिगेट" (Project 1135.6 Additional Follow-on Frigate) अंतर्गत तयार करण्यात आले आहे.
• आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत स्वदेशी युद्धनौका बांधणीतील हे एक मोठे पाऊल मानले जाते.
• 'महाभारत' मधील महान योद्धा 'भीम' यांच्या गदावरून या जहाजाला ‘तवस्या’' असे नाव देण्यात आले आहे.
• जे भारतीय नौदलाच्या अदम्य अदम्य उत्साहाचे आणि वाढत्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करते.
तवस्या युद्धनौकेची निर्मिती कोणी केली ?
• गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited (GSL)) ने तवस्या युद्धनौकेची निर्मिती केली आहे.
• 25 जानेवारी 2019 रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात दोन प्रोजेक्ट 1135.6 फॉलो-ऑन फ्रिगेट्सच्या बांधकामाचा करार झाला.
• पहिले जहाज 'ट्रिपुट' (Triput) जुलै 2024 मध्ये लाँच करण्यात आले.
• दुसरे जहाज ‘तवस्या’ (Tavasya) मार्च 2025 मध्ये लाँच करण्यात आले.
प्रोजेक्ट 1135.6 म्हणजे काय ?
What is Project 1135.6 ?
• प्रोजेक्ट 1135.6 हा स्टेल्थ फ्रिगेट (युद्ध नौका) बांधकामासाठी भारत-रशिया द्विपक्षीय नौदल प्रकल्प आहे.
• भारत आणि रशियाने 4 अतिरिक्त स्टेल्थ फ्रिगेटसाठी करार केला.
• तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) अंतर्गत 2 जहाजे रशियामध्ये आणि 2 भारतात (गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये) बांधली जाणार होती.
• रशियामध्ये बांधलेले दोन फ्रिगेट्स : INS तुशील (डिसेंबर २०२४ मध्ये कार्यान्वित), तमल (जून २०२५ मध्ये कार्यान्वित).
• भारतात बांधले जाणारे दोन फ्रिगेट्स : त्रिपुट (जुलै 2024 मध्ये लाँच), तवस्य (मार्च 2025 मध्ये लाँच).
• या प्रगत स्टेल्थ युद्धनौकांसह भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्याला बळकटी देणे. हा या मागील उद्देश होता.