
चालू घडामोडी 29, मार्च 2025 | इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन | Indira Gandhi Memorial Tulip Garden

इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन
Indira Gandhi Memorial Tulip Garden
Subject : GS - पर्यटन, सण आणि उत्सव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन असलेले इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन कोणत्या ठिकाणी आहे ?
(सरळसेवा भरती, रेल्वे भरती, SC GD 2021, SSC CHSL 2021)
1. धर्मशाळा
2. शिमला
3. देहरादून
4. श्रीनगर
उत्तर : श्रीनगर (Srinagar)
बातमी काय आहे ?
• जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डनचे अधिकृत उद्घाटन केले.
इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्रीनगर मधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप उद्यान म्हणून लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल झाले.
• हे झाबरवान पर्वतरांगेच्या पायथ्याशी तसेच दल सरोवरच्या (Dal Lake) किनाऱ्यावर वसलेले आहे.
• गार्डन 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले असून या गार्डनमध्ये 48 प्रकारची ट्युलिप फुलं आहेत.
• काश्मीरमधील फुलशेती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हे गार्डन 2007 मध्ये उघडण्यात आले होते.
• इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन पूर्वी " सिराज बाग " या नावाने ओळखले जात असे.
ट्यूलिप महोत्सव (Tulip Festival) कोणत्या शहरात प्रसिद्ध आहे ?
(SSC CHSL 2023)
• ट्यूलिप महोत्सव हा भारतातील जम्मू आणि काश्मीर केंद्र शासित प्रदेशााची राजधानी श्रीनगर येथे आयोजित केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे.
• काश्मीर खोऱ्यात वसंत ऋतू सुरू होण्याच्या काळात हा उत्सव आयोजित केला जातो.
• साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यात जेव्हा श्रीनगरमधील ट्यूलिप बाग पूर्णपणे बहरलेली असते, तेव्हा ट्यूलिप महोत्सव आयोजित केला जातो.
• बागेतील विविध प्रकारच्या फुलांच्या श्रेणींचे प्रदर्शन पर्यटकांसाठी खास मेजवानी आहे.
• त्याचबरोबर या महोत्सवात जम्मू आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शने आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे.
• या महोत्सवात जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
• हा उत्सव जम्मू आणि काश्मीर सरकारच्या पर्यटन प्रयत्नांचा एक भाग आहे.