
चालू घडामोडी 05, एप्रिल 2025 | राष्ट्रीय सागरी दिवस | National Maritime Day

राष्ट्रीय सागरी दिवस
National Maritime Day
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो ?
1. 1 एप्रिल
2. 5 एप्रिल
3. 9 एप्रिल
4. 12 एप्रिल
उत्तर : 5 एप्रिल
बातमी काय ?
• राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी इंडियन सेलर्स होम, मस्जिद बंदर, मुंबई येथे भेट देऊन प्रथम व द्वितीय महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रीय सागरी दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी 5 एप्रिल या दिवशी साजरा करतात.
• यंदाचा (2025 वर्षीचा) हा 62 वा राष्ट्रीय सागरी दिन आहे.
राष्ट्रीय सागरी दिन का साजरा केला जातो ?
• भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा सन्मान करण्यासाठी
• भारताच्या सागरी क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकांचा सन्मान करण्यासाठी
• आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच देशातील अर्थव्यवस्थेत सागरी व्यापारातील आणि सागरी क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी
5 एप्रिल या दिवशी राष्ट्रीय सागरी दिन का साजरा केला जातो ?
• राष्ट्रीय सागरी दिन हा दिवस 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईहून लंडनला निघालेल्या पहिल्या भारतीय मालकीच्या व्यापारी जहाज एसएस लॉयल्टीच्या (SS Loyalty) स्मरणार्थ साजरा केला जातो.
• 5 एप्रिल 1919 या दिवशी भारताने आंतरराष्ट्रीय शिपिंगमध्ये प्रवेश केला आणि सागरी व्यापारातील ब्रिटिश वर्चस्व मोडले.
पहिला राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा करण्यात आला ?
• 5 एप्रिल 1964 रोजी पहिला राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात आला.
नोट :
• राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day): 5 एप्रिल
• जागतिक सागरी दिन (World Maritime Day) : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी