
चालू घडामोडी 04, एप्रिल 2025 | पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी थायलंडच्या अधिकृत दौऱ्यावर | PM Shri Narendra Modi's on an Official Visit to Thailand

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी थायलंडच्या अधिकृत दौऱ्यावर
PM Shri Narendra Modi's on an Official Visit to Thailand
Subject : GS - जगाचा भूगोल - भारत आणि शेजारील देश
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या अधिकृत दौऱ्यावर आहे, तर थायलंड देशाची राजधानी कोणती ?
1. बॅंकॅाक
2. व्हिएन्टिन
3. माले
4. जकार्ता
उत्तर : बॅंकॅाक (Bangkok)
• थायलंडची देशाची राजधानी : बॅंकॅाक (Bangkok)
• लाओस देशाची राजधानी : व्हिएन्टिन (Vientiane)
• मालदीव देशाची राजधानी : माले (Malé)
• इंडोनेशिया देशाची राजधानी : जकार्ता (Jakarta)
बातमी काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या अधिकृत दौऱ्यात थायलंडच्या पंतप्रधान महामहिम पायतोंगटार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra) यांची बँकॉकमध्ये भेट घेतली.
थायलंड सरकार कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष भेट :
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे औचित्य साधून थायलंड सरकारने सद्भावनेचे प्रतीक म्हणून 18 व्या शतकातील रामायण भित्तिचित्रांचे चित्रण असलेले एक विशेष टपाल तिकीट जारी केले.
• दोन्ही देशांमधील घनिष्ठ सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध अधोरेखित करताना पंतप्रधान शिनावात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाली भाषेतील बौद्ध पवित्र ग्रंथ "‘तिपिटक’ ची विशेष आवृत्ती भेट दिली.
भारत आणि थायलंडमध्ये झालेला करार :
• दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत भारत-थायलंड धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्याच्या संयुक्त घोषणापत्राचे आदानप्रदान झाले.
• हातमाग आणि हस्तकला; डिजिटल तंत्रज्ञान; सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई); आणि सागरी वारसा या क्षेत्रातील सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली.
• दोन्ही नेत्यांनी भारत-थायलंड कॉन्सुलर संवाद स्थापनेचे स्वागत केले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील जनतेचा संपर्क अधिक सुलभ होईल.
पायतोंगटार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra) यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
• पायतोंगटार्न शिनावात्रा या माजी पंतप्रधान आणि अब्जाधीश ताक्सिन चिनावत यांची 37 वर्षीय मुलगी आहे.
• पायतोंगटार्न या थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.
थायलंड देशा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• थायलंड हा आग्नेय आशियातील एक देश आहे.
• थायलंड देशाचे पूर्वीचे नाव सियाम (Siam) असे होते.
• या देशाचे 1939 मध्ये थायलंड असे नामकरण करण्यात आले.
• थायलंड शब्दाचा अर्थ मुक्त देश असा होतो.
• थायलंडची राजधानी बॅंकॅाक (Bangkok) ही आहे.
• राष्ट्रीय चलन : थाई बात (Thai Baht) (THB)
• अधिकृत भाषा : थाई (Thai)
• बौद्ध धर्म हा थायलंड देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) आहे.
• थायलंड मधील 92.5% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.
• पर्यटन हा या देशाचा मुख्य व्यवसाय आहे.
थायलंड देशाची सीमा कोण-कोणत्या देशांना लागून आहे ?
• म्यानमार
• लाओस
• कंबोडिया
• मलेशिया
प्रश्न) भारत ते थायलंड महामार्ग कोणत्या देशातून जातो ?
(सरळसेवा भरती, SSC MTS 2017)
उत्तर : म्यानमार
प्रश्न) ----- देशाला बौद्ध भिक्खूंचा देश असे म्हणतात.
उत्तर : थायलंड