
चालू घडामोडी 03, एप्रिल 2025 | AI साठी महाराष्ट्राचा सामंजस्य करार | Maharashtra Government Signs MoU for AI centres

AI साठी महाराष्ट्राचा सामंजस्य करार
Maharashtra Government MoU for AI centres
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच महाराष्ट्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला ?
1. इन्फोसिस (Infosys)
2. विप्रो (Wipro)
3. मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
4. मेटा (Meta)
उत्तर : मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
बातमी काय आहे ?
• कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करण्यासाठी आणि महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात आज सामंजस्य करार पार पडला.
महाराष्ट्र 3 ‘AI’ उत्कृष्टता केंद्रे कोठे आहे ? ते काय काम करतील ?
• महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात AI तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे तीन अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस Artificial Intelligence (AI) उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनसोबत सामंजस्य करार (Memorandum of Understanding (MoU)) केला आहे.
मुंबई- भूगोल विश्लेषण केंद्र (Geospatial Analytics Centre) :
• मुंबई येथे भूगोल विश्लेषण केंद्र स्थापन करण्यात येईल.
• हे केंद्र मुख्य सचिव कार्यालयात कार्यरत राहील.
• उपग्रह इमेजरी विश्लेषण, भू-सांख्यिकी व्यवस्थापन आणि GIS आधारित वापराच्या माध्यमातून शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत याची मदत होईल.
पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि 'AI' केंद्र (Forensic Research and AI Centre) :
• पुणे येथे न्यायवैज्ञानिक संशोधन (Forensic Research) आणि ‘AI केंद्र स्थापन करण्यात येईल.
• गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा उपयोग वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल.
नागपूर – मार्व्हेल (MARVEL) केंद्र :
• नागपूर येथे मार्व्हेल केंद्र आहे.
• येथे कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि सुधारित प्रशासनासाठी ‘ए.आय.’वर आधारित संशोधन आणि प्रशिक्षण
• तसेच, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘AI.’ प्रशिक्षण व मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे प्रदान केली जातील.
• MS Learn या जागतिक दर्जाच्या प्लॅटफॉर्मद्वारे प्रशासन अधिक सक्षम व तंत्रज्ञानस्नेही होईल.
MARVEL म्हणजे काय ?
MARVEL ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• MARVEL चा फूल फॅार्म Maharashtra Advanced Research and Vigilance for Enforcement of Reformed Laws Limited असा आहे.
• महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजिलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोर्समेंट लि.- (MARVEL) ही कंपनी 2024 मध्ये स्थापन करण्यात आली.
• राज्य पोलीस दलातील कृत्रिम बृद्धीमत्तेच्या वापरासाठी
• तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराद्वारे कायद्याची अंमलबजावणी वाढविण्यासाठी MARVEL ची स्थापन करण्यात आली.