
चालू घडामोडी 03, एप्रिल 2025 | नाविका सागर परिक्रमा II | NAVIKA SAGAR PARIKRAMA II

नाविका सागर परिक्रमा II
NAVIKA SAGAR PARIKRAMA II
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नाविका सागर परिक्रमा – 2 मोहिमे बद्दल योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
1. गोवा येथून नाविका सागर परिक्रमा – 2 मोहिम सुरू झाली.
2. भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य
बातमी काय ?
• भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज - आयएनएसव्ही तारिणी (INSV Tarini) हे आपल्या नाविक सागर परिक्रमा दुसरी या मोहिमेमधील चौथा टप्पा पूर्ण करुन दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन मध्ये दाखल झाले.
नाविका सागर परिक्रमा – 2 मोहिम काय आहे ?
नाविका सागर परिक्रमा – 2 ही मोहीम केव्हा सुरू करण्यात आली ?
• नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोवा येथून नाविका सागर परिक्रमा – 2 मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते.
• या मोहिमेअंतर्गत आठ महिन्यांच्या कालावधीत 23,400 नॉटिकल मैल ( 43,300 किमी) पेक्षा जास्त अंतर कापण्याचे उद्दिष्ट आहे.
• INSV तारिणी जहाज मे 2025 मध्ये प्रदक्षिणा पूर्ण करुन गोव्यात दाखल होईल.
• या मोहिमेत आतापर्यंत या जहाजाने फ्रीमँटल (ऑस्ट्रेलिया), लिटलटन (न्यूझीलंड) आणि पोर्ट स्टॅनली(केपटाऊन) असे एकूण तीन थांबे घेतले आहेत.
नाविक सागर परिक्रमा – 2 या मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहे ?
• भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर दिलना के (Lt Cdr Dilna K) आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए (Lt Cdr Roopa A) , या दोन महिला अधिकारी भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज - (INSV तारिणीवरील) या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.

नाविका सागर परिक्रमा – 2 मोहिम महत्वपूर्ण का आहे ?
• नाविका सागर परिक्रमा II ही मोहीम भारतीय सशस्त्र दलातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देते.
• ही मोहीम युवतींनी सशस्त्र दल सेवेत विशेषतः भारतीय नौदलात मोठ्या प्रमाणात प्रवेश घ्यावा यासाठी प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा आहे.
• याशिवाय नौवहन आणि वैज्ञानिक संशोधन वाढीस लागावे यासाठी देखील मोहिमेची ही आवृत्ती प्रेरणादायक आहे.