
चालू घडामोडी 02, एप्रिल 2025 | विकसित भारत युवा संसद 2025 | Viksit Bharat Youth Parliament 2025

विकसित भारत युवा संसद 2025
Viksit Bharat Youth Parliament 2025
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'विकसित भारत युवा संसद २०२५' महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला ?
1. मुंबई
2. नवी दिल्ली
3. चेन्नई
4. वाराणसी
उत्तर : नवी दिल्ली
बातमी काय ?
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने (Ministry of Youth Affairs and Sports) 1 ते 3 एप्रिल 2025 दरम्यान ‘विकसित भारत युवा संसद’ महोत्सव आयोजित करण्यात आला.
‘विकसित भारत युवा संसद’ का आयोजित करण्यात आला ?
‘विकसित भारत युवा संसद’ कार्यक्रमाचे उदिष्ट कोणते ?
• पारंपरिक युवा संसदेची पुनर्कल्पना करणे.
• राजकारण आणि सार्वजनिक धोरणात तरुणांना सहभागी करून घेणे.
• प्रशासन आणि राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवणे.
‘विकसित भारत युवा संसद’ कार्यक्रम म्हणजे काय ? तो कसा असेल?
• ‘विकसित भारत युवा संसद’ कार्यक्रम 3 प्रमुख फेरीत घेतला जाईल.
• जिल्हा नोडल फेरी, राज्य स्तरीय फेरी आणि राष्ट्रीय फेरी.
जिल्हा नोडल फेरी :
• एक राष्ट्र, एक निवडणूक या विषयावरील चर्चा, 300 जिल्हा नोडल स्तरावर झालेल्या संवादांद्वारे घेण्यात आली.
• ज्यात इच्छुक उमेदवारांनी "विकसित भारताचा तुमच्या लेखी काय अर्थ होतो?" या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ द्वारे दिले.
राज्य स्तरीय फेरी :
• 17 हून अधिक राज्यातील विधानसभा आणि इतर सरकारी आस्थापनांमध्ये ही फेरी आयोजित करण्यात आली.
• या फेऱ्यांनी युवक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी एक दुवा म्हणून काम केले.
राष्ट्रीय फेरी :
• 1 एप्रिल ते 3 एप्रिल 2025 या कालावधीत राष्ट्रीय फेरी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.
• प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील (एकूण 108 तरुण) सर्वोत्कृष्ट 3 उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावरील फेरीत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
• या फेरीतसाठी पात्र ठरलेले सहभागी उच्चस्तरीय चर्चा आणि उपक्रमांमध्ये सहभागी होतील जसे की
• प्रश्नोत्तर तास : हा तास एक राष्ट्र, एक निवडणूक आणि विकसित भारत यावर केंद्रित असेल.
• मास्टरक्लास : या सत्रात एक ज्येष्ठ संसद सदस्य तरुणांना संसदेत आवश्यक असणारे वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्यांबाबत मार्गदर्शन करतील.
पुरस्कार समारंभ :
3 एप्रिल 2025 रोजी, विकसित भारत युवा संसद पुरस्कार (Viksit Bharat Youth Parliament Awards) आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार (National Youth Awards) प्रदान केले जातील.