
चालू घडामोडी 31, मार्च 2025 | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती | Hurun Global Rich List 2025

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Hurun Global Rich List 2025
Subject : GS - रिपोर्ट
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील पहिल्या 10 श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ?
1. नीता अंबानी
2. रोशनी नादर
3. सुधा मूर्ती
4. वंदना लूथरा
उत्तर : रोशनी नादर (Roshni Nadar)
बातमी काय आहे ?
• अलिकडेच हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 (Hurun Global Rich List 2025) ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
1. एलोन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

2. दुसऱ्या क्रमांकावर अमेझॉन कंपनीचे जेफ बेझोस (Jeff Bezos)

3. तिसऱ्या क्रमांकावर मेटा कंपनीचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे आहे.

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ?
1. मुकेश अंबानी हे भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
2. दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी
3. तिसऱ्या क्रमांकावर रोशनी नादर या आहेत.
जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ?
• HCL Technologies’ च्या अध्यक्षा रोशनी नादर यांनी हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान मिळवला आहे.
• या यादीत समाविष्ट होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
• रोशनी नादर या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत.
• रोशनी नादर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला
• रोशनी नादर या भारतातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनली आहे.
• रोशनी नादर यांची एकूण संपत्ती 3.5 लाख कोटी रुपये (40 अब्ज डॅालर ) इतकी आहे.