
चालू घडामोडी 01, एप्रिल 2025 | ‘ऑपरेशन ब्रह्मा’ म्हणजे काय ? | OPERATION BRAHMA

‘ऑपरेशन ब्रह्मा’ म्हणजे काय ?
OPERATION BRAHMA
Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ मोहीम हाती घेतली. ही मोहीम खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. नक्षलवाद विरोधी मोहीम
2. सायबर गुन्ह्यांविरोधी मोहीम
3. मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम
4. युद्ध सराव
उत्तर : मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम
‘ऑपरेशन ब्रह्मा’ बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• म्यानमारमध्ये 28 मार्च 2025 रोजी आलेल्या विनाशकारी भूकंपाच्या आपत्तीत म्यानमारला तातडीची मदत पुरवण्यासाठी, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ मोहीम हाती घेतली आहे.
• परराष्ट्र मंत्रालयाच्या (Ministry of External Affairs) निर्देशांनुसार, एकात्मिक संरक्षण स्टाफ मुख्यालय, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या सहकार्याने मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (Humanitarian Assistance and Disaster Relief ) प्रयत्न सुरू आहेत.
• या अंतर्गत तातडीची मानवतावादी मदत पुरवण्यासाठी विशेष वैद्यकीय कृती दल तैनात करण्यात आले.
• ही मानवतावादी मदत भारताच्या ‘शेजारी प्रथम' (‘Neighbourhood First’ Policy) या धोरणाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
• तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ – संपूर्ण विश्व हेच एक कुटुंब या भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष प्रत्यय देते.
• भारतीय नौदलाची जहाजे यंगून कडे मदतकार्यासाठी रवाना होतील.
• या जहाजांवर सुमारे 52 टन मदत सामग्री चढवण्यात आली
• ज्यामध्ये आवश्यक कपडे, पिण्याचे पाणी, अन्न, औषधे आणि आपत्कालीन वस्तूंचा समावेश आहे.
• भारतीय नौदल हा या प्रदेशातील "पहिला प्रतिसादकर्ता" (फर्स्ट रिस्पॉन्डर) म्हणून कार्य करण्याच्या भारताच्या संकल्पनेप्रति पूर्णतः कटिबद्ध आहे.