
चालू घडामोडी 02, एप्रिल 2025 | आंतरराष्ट्रीय रामायण परिषद | International Ramayana Conclave

आंतरराष्ट्रीय रामायण परिषद
International Ramayana Conclave
Subject : GS - इतिहास - कला आणि संस्कृती, भूगोल - पर्यटन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आंतरराष्ट्रीय रामायण परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले ?
1. नवी दिल्ली
2. वाराणसी
3. कोलंबो
4. चेन्नई
उत्तर : कोलंबो
बातमी काय आहे ?
• आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन संस्थेने श्रीलंका देशातील कोलंबो शहरातील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात रामायण परिषदेचे आयोजन केले.
• या परिषदेत भारत आणि श्रीलंकेतील प्रख्यात विद्वान आणि धार्मिक नेते सहभागी झाले होते.
• या परिषदेत, भगवान श्री रामांचा जागतिक प्रभाव आणि श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली.
• त्याचबरोबर ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुराव्यांद्वारे रामायणाचा सांस्कृतिक प्रभाव स्पष्ट करण्यात आला.
श्रीलंकेतील महत्त्वाची रामायण स्थळे कोणती ?
सीता एलिया (Seetha Eliya) किंवा सीता अम्मन मंदिर (Seetha Amman Temple) :
• या ठिकाणी रावणाने सीता मातेला बंदिवान म्हणून ठेवले होते असे मानले जाते.
• येथे असलेले सीता मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
• या मंदिराला अशोक वाटिका सीता मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

मनवारी मंदिर (Manavari Temple) :
• श्रीलंकेतील चिलाव येथे स्थित, हे मंदिर रावणावर विजय मिळवल्यानंतर भगवान श्री राम यांनी शिवलिंगाची स्थापना केलेली ही पहिली जागा असल्याचे मानले जाते.
• त्याला "रामलिंग" म्हणतात, आणि असे मानले जाते की येथे पूजा केल्याने पापांपासून मुक्तता मिळते.

मुन्नेश्वरम मंदिर (Munneswaram Temple) :
• रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्री राम यांनी भगवान शिवाची पूजा या मंदिरात केली होती.
• हे मंदिर हिंदू आणि बौद्ध दोन्ही समुदायांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते.
