ओडिशा राज्य स्थापना दिन
Odisha Foundation Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, इतिहास - कला आणि संस्कृती, भूगोल - पर्यटन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1 एप्रिल रोजी कोणते राज्य उत्कल दिवस साजरा करते ?
1. ओडिशा
2. केरळ
3. कर्नाटक
4. आंध्र प्रदेश
उत्तर : ओडिशा (Odisha)
बातमी काय आहे ?
• दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस ओडिशा राज्य स्थापना दिन किंवा उत्कल दिवस म्हणून साजरा केला जातो.
कोणत्या राज्याला प्राचीन काळी उत्कल म्हणून ओळखले जात असे ?
• प्राचीन काळी ओडिशाला "उत्कल" असे म्हटले जात असे, ज्याचा अर्थ "कुशल कारागिरांची भूमी" असा होतो.
• 1 एप्रिल हा दिवस ओडिशा राज्य स्थापना दिन किंवा उत्कल दिवस म्हणून साजरा केला जातो.
ओडिशा राज्याची स्थापना केव्हा झाली ?
• 1 एप्रिल 1936 रोजी ओडिशा राज्याची स्थापना करण्यात आली.
• 1936 मध्ये ब्रिटीश राजवटीतील बिहार, ओडिशा आणि मद्रास प्रांतांमधून काही भाग वेगळे करून ओडिशा हे स्वतंत्र राज्य (एक स्वतंत्र प्रांत) म्हणून स्थापन करण्यात आले.
• राज्याचे पूवीचे नाव "ओरिसा" (Orissa)असे होते.
• 2011 या मध्ये "ओरिसा" (Orissa) चे अधिकृतपणे "ओडिशा" (Odisha) असे नामकरण करण्यात आले.
कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोका बौद्ध धर्माचे समर्थक बनले ?
कलिंग युद्ध कोठे लढले गेले ?
• इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील कलिंग युद्ध ओडिशामध्ये लढले गेले.
• सम्राट अशोकाने इ.स.पू. 261 मध्ये कलिंग जिंकले, ज्यामुळे प्रसिद्ध कलिंग युद्ध झाले, कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोक यांनी बुद्धांच्या शिकवणींचा स्वीकार करून ते बौद्ध धर्माचे समर्थक बनले.
कोणार्क येथील उल्लेखनीय सूर्यमंदिर कोणी बांधले ?
• कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून या मंदिराची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. 1238-1264) यांनी करविली.
• हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये आहे.
• कोणार्क मंदिराला "ब्लॅक पॅगोडा" (Black Pagoda) नावानेही ओळखले जाते.
• कोणार्क येथील सूर्य मंदिर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ (UNESCO World Heritage Site) म्हणून प्रसिद्ध आहे.

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेले चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, SSC GD 2021)
उत्तर : ओडिशा
भगवान जगन्नाथांची रथयात्रा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध उत्सव आहे ?
(सरळसेवा भरती, SSC MTS 2017, 2022)
उत्तर : ओडिशा
ओडिशा राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ओडिशाची राजधानी : भुवनेश्वर (Bhubaneswar)
• प्रमुख वारसा स्थळे : कोणार्क सूर्य मंदिर, भगवान जगन्नाथ मंदिर, लिंगराज मंदिर
• प्रमुख स्मारके : उदयगिरी आणि खंडगिरी लेणी, धौली शांती स्तूप,
• प्रमुख नद्या : महानदी, ब्राह्मणी, सुवर्णरेखा, बैतरणी
• राष्ट्रीय उद्याने : सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, भितरकणिका राष्ट्रीय उद्यान
• वन्यजीव अभयारण्य : चिल्का वन्यजीव अभयारण्य, नंदनकानन वन्यजीव अभयारण्य
• प्रसिद्ध सण आणि उत्सव : रथयात्रा, दुर्गा पूजा, कोणार्क उत्सव