
चालू घडामोडी 05, एप्रिल 2025 | इंद्रा नौदल सराव | Naval Exercise INDRA

इंद्रा नौदल सराव
Naval Exercise INDRA
Subject : GS - संरक्षण - युद्ध सराव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) इंद्रा नौदल सराव हा कोणत्या दोन देशांमधील सागरी सराव (Maritime Exercise) आहे ?
1. भारत - अमेरिका
2. भारत - रशिया
3. भारत - फ्रान्स
4. भारत - इंडोनेशिया
उत्तर : भारत - रशिया
भारताचे संयुक्त नौदल सराव :
• भारत - अमेरिका : सॅल्वेक्स (SALVEX)
• भारत - रशिया : इंद्रा (INDRA)
• भारत - फ्रान्स : वरूणा (Varuna)
• भारत - इंडोनेशिया : समुद्र शक्ती (Samudra Shakti)
बातमी काय आहे ?
अलिकडेच भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव इंद्रा - 2025 (INDRA-2025) पार पडला.
इंद्रा नौदल सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• इंद्रा हा भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांच्यातील सागरी सराव (maritime exercise) आहे.
• इंद्रा हा द्वैवार्षिक नौदल सराव आहे; म्हणजे हा नौदल सराव दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो.
• इंद्रा नौदल सराव 2003 पासून सुरू झाला, यंदाची या सरावाची 14 वी आवृत्ती आहे.
इंद्रा नौदल युद्ध सरावाचे आयोजन कोणत्या देशाने केले ?
• इंद्रा नौदल सरावाचे आयोजन भारताने 28 मार्च ते 02 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केले.
• यंदाची या सरावाची 14 वी आवृत्ती आहे.
2025 ची ही 14 वी आवृत्ती दोन टप्प्यात आयोजित केले :
1. चेन्नई येथील बंदर टप्पा (Harbour Phase)
2. बंगालच्या उपसागरातील समुद्री टप्पा (Sea phase)
इंद्रा नौदल सराव 2025 चा फायदा काय ?
• या सरावामुळे दोन्ही देशांच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ झाली,
• एकमेकांच्या ऑपरेशनल सिद्धांतांची सखोल समज वाढली.
• जटिल सागरी वातावरणात अखंडपणे काम करण्याची क्षमता वाढली.
• सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून,
• दोन्ही देशांतील दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे संबंध अधिक बळकट होतील.
इंद्रा या नौदल सरावाचे उद्दिष्ट काय ?
इंद्रा नौदल सराव का आयोजित केला जातो ?
• सागरी धोक्यांचा सामना करणे,
• जागतिक शांतता आणि स्थैर्य वाढवणे आणि
• संयुक्त ऑपरेशन्स मजबूत करणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे.