
चालू घडामोडी 05, एप्रिल 2025 | भारताचा भारतकुमार हरपला... | Legendary actor Manoj Kumar passes away

भारताचा भारतकुमार हरपला....
Legendary actor Manoj Kumar passes away
चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतकुमार टोपण नावाने कोणते ज्येष्ठ अभिनेते ओळखले जातात ?
1. दिलीप कुमार
2. मनोज कुमार
3. अशोक कुमार
4. शशि कपूर
उत्तर : मनोजकुमार
बातमी काय ?
• ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी, 4 एप्रिल 2025 रोजी सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
• मुंबईत कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
• मनोज कुमार हे एक भारतीय अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक होते.
मनोज कुमार यांचं मूळ नाव काय ?
• मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी (Harikrishna Giri Goswami) असं होत.
• त्यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी एबटाबाद (आता पाकिस्तानमध्ये) या ठिकाणी झाला.
• मनोज कुमार यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले.
हरिकृष्ण नाव बदलून मनोज कुमार का ठेवले ?
• लहानपणापासूनच हरिकृष्ण गोस्वामी यांना चित्रपट पाहण्याची, अभिनयाची आवड होती.
• अशोक कुमार, दिलीप कुमार यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले.
• यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलून मनोज कुमार असे केले.
भारतकुमार टोपण नावाने कोणते ज्येष्ठ अभिनेते ओळखले जातात ?
• देशभक्तीवर मनोज कुमार यांनी अनेक सिनेमे केले, ते सर्व लोकप्रिय झाले.
• त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे.
• देशभक्त नायक म्हणून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे भारतकुमार हे टोपणनाव त्यांना मिळालं.
मनोज कुमार यांच्या चित्रपटांपैकी काही महत्त्वाचे चित्रपट :
• शहीद
• क्रांती
• शोर
• पुरब और पश्चिम
• रोटी कपडा और मकान
• उपकार
• पत्थर के सनम
महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान :
• पद्मश्री पुरस्कार (1992)
• दादासाहेब फाळके पुरस्कार (2015)
• जीवनगौरव पुरस्कार
• त्यांना विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आणि सात फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.