
चालू घडामोडी | 'Qdenga' डेंग्यू प्रतिबंधक लस

'Qdenga' Dengue Vaccine
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताने नुकतीच मान्यता दिलेली 'Qdenga' (TAK-003) ही डेंग्यू प्रतिबंधक लस खालीलपैकी कोणत्या देशातील कंपनीने विकसित केली आहे ?
1. अमेरिका
2. जपान
3. जर्मनी
4. भारत
उत्तर : भारत
📰 बातमी काय ?
• भारतीय औषध महानियंत्रक (DCGI) अंतर्गत विषय तज्ज्ञ समितीने (SEC) ताकेडा (Takeda) कंपनीच्या TAK-003 (Qdenga) या डेंग्यू प्रतिबंधक लसीला भारतात मान्यता दिली आहे.
• भारताने ‘Qdenga’ ही पहिली डेंग्यू लस मंजूर केली आहे.
🦟 डेंग्यू प्रतिबंधक लसीबद्दल महत्त्वाची माहिती :
• लसीचे नाव: TAK-003 (व्यापारी नाव : Qdenga).
• उत्पादक कंपनी: ताकेडा (Takeda - जपान).
• वयोगट: 4 ते 60 वयोगटातील व्यक्तींसाठी मंजूर.
💉 ‘Qdenga’ लसीचा प्रकार :
• ‘Qdenga’ ही डेंग्यूविरुद्ध तयार केलेली 'टेट्राव्हॅलेंट' (Tetravalent) लस आहे, म्हणजेच ती डेंग्यूच्या चार प्रकारांवर (DENV-1, DENV-2, DENV-3 आणि DENV-4) काही प्रमाणात कार्य करते.
• ही लस संसर्ग पूर्णपणे थांबवत नाही, पण रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ नये यासाठी मदत करते.
🎯 ही लस का महत्त्वाची आहे ?
• भारतामध्ये दरवर्षी डेंग्यूचे प्रमाण वाढताना दिसते.
• आतापर्यंत यावर मुख्य उपाय म्हणजे डास नियंत्रण (Vector Control) होते.
• पण ही लस आल्यामुळे आता डेंग्यूविरुद्ध लढा अधिक मजबूत होणार आहे, कारण ती थेट आजाराची तीव्रता कमी करण्यावर काम करते.
⚙️ ही लस कशी वेगळी आहे ?
• या लसीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती घेण्यासाठी आधी डेंग्यू झाला आहे का नाही, हे तपासण्याची गरज नाही.
• त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण (mass rollout) करणे सोपे होते.
• तसेच ही लस 28,000 पेक्षा जास्त लोकांवर चाचणी करून तयार करण्यात आली असून, अनेक देशांमध्ये आधीच वापरली जात आहे.
🧐 मर्यादा आणि आव्हाने :
✍️ या लसीची काही मर्यादा देखील आहेत.
• डेंग्यूचे चार प्रकार असले तरी ही लस DENV-2 वर जास्त प्रभावी आहे, तर DENV-3 आणि DENV-4 वर तिचा प्रभाव तुलनेने कमी आहे.
• विशेषतः ज्या व्यक्तींना कधीही डेंग्यू झाला नाही (seronegative), त्यांच्यात ही लस कमी प्रभावी ठरू शकते.
• याशिवाय भारतात DENV-3 प्रकाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे लसीचा एकूण परिणाम मर्यादित राहू शकतो.
• आणखी एक मोठे आव्हान म्हणजे खर्च — दोन डोससाठी सुमारे ₹6,000 ते ₹12,000 खर्च येऊ शकतो, जो सर्वांसाठी परवडणारा नाही.
🇮🇳 भारताचे पाऊल :
• भारत स्वतःची ‘DengiAll’ नावाची लस विकसित करत आहे, जी चारही प्रकारांवर समान प्रभाव देण्याचा प्रयत्न करते.
• ही लस 2027 पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

🦠 डेंग्यू कशामुळे होतो ? (Causes) :
• कारणीभूत घटक : डेंग्यू हा एक विषाणूजन्य (Viral) आजार आहे.
• विषाणूचे नाव : डेंग्यू हा RNA विषाणू असून तो 'फ्लॅव्हीव्हायरस' (Flavivirus) या कुळातील आहे.
• प्रकार (Serotypes) : डेंग्यूचे प्रामुख्याने 4 प्रकार असतात; DENV-1, DENV-2, DENV-3 आणि DENV-4.
🦟 डेंग्यूचा प्रसार कसा होतो ? (Modes of Transmission) :
1) प्रसारक (Vector) - डेंग्यूचा प्रसार 'एडिस इजिप्ती' (Aedes aegypti) या जातीच्या संसर्गबाधित मादी डासाच्या चावण्यामुळे होतो.
2) डासाचे वैशिष्ट्य - या डासांच्या अंगावर पांढरे पट्टे असतात, म्हणून त्यांना 'टायगर मॉस्किटो' (Tiger Mosquito) असेही म्हणतात.
3) प्रसार चक्र - हे चक्र 'माणूस ➡️ डास ➡️ माणूस' असे चालते.
• जेव्हा एखादा डास डेंग्यूग्रस्त रुग्णाला चावतो, तेव्हा तो विषाणू डासाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर तोच डास एखाद्या निरोगी व्यक्तीला चावल्यास डेंग्यूचा संसर्ग त्या व्यक्तीला होतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Qdenga Dengue Vaccine
• Qdenga — भारतात मान्यता मिळालेली पहिली पहिली डेंग्यू लस
• लसीचे नाव: TAK-003 (व्यापारी नाव : Qdenga).
• उत्पादक कंपनी: ताकेडा (Takeda - जपान).
• वयोगट: 4 ते 60 वयोगटातील व्यक्तींसाठी मंजूर.













