
चालू घडामोडी | मिशन वंदे मातरम्
Mission Vande Mataram
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच 'मिशन वंदे मातरम'अंतर्गत जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट'वर यशस्वी चढाई करणारी पहिली संपूर्ण महिला गिर्यारोहक मोहीम खालीलपैकी कोणत्या सुरक्षा दलाने (Security Force) पार पाडली आहे ?
- सीमा सुरक्षा दल (BSF - Border Security Force)
- केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF - Central Reserve Police Force)
- राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG - National Security Guard)
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP - Indo-Tibetan Border Police)
उत्तर : सीमा सुरक्षा दल (BSF - Border Security Force)
📰 बातमी काय ?
• सीमा सुरक्षा दलाच्या (BSF - Border Security Force) इतिहासामध्ये पहिल्यांदाच संपूर्ण महिला गिर्यारोहक पथकाने (All-Women Mountaineering Expedition) जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट'वर यशस्वी चढाई केली आहे.

🇮🇳 'मिशन वंदे मातरम' काय आहे ?
• सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) पहिल्या पूर्ण महिला गिर्यारोहक संघाने (All-Women Mountaineering Expedition) जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट'वर यशस्वी चढाई केली आहे.
• या मोहिमेला 'मिशन वंदे मातरम' (Mission Vande Mataram) असे नाव देण्यात आले होते.
• औचित्य - BSF चा हीरक महोत्सव (Diamond Jubilee - 60 वर्षे) आणि भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'च्या स्थापनेचा 150 वा वर्धापनदिन यांचे औचित्य साधून ही मोहीम राबवण्यात आली.
• पर्यावरणीय संदेश - या पथकाने 'क्लीन हिमालय – क्लीन ग्लेशियर्स' (Clean Himalaya – Clean Glaciers) अंतर्गत एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि इतर कॅम्पमधून कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.
🛡️सीमा सुरक्षा दल (BSF) बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• स्थापना - 1 डिसेंबर 1965 रोजी (भारत-पाकिस्तान युद्धानंतर)
• ओळख - भारताची 'पहिली संरक्षण फळी' (First Line of Defence) म्हणून BSF ओळखले जाते.
• जबाबदारी - भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी BSF कडे आहे.
• मंत्रालय - सीमा सुरक्षा दल (BSF) हे भारताच्या 7 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी (CAPFs) एक असून, हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अंतर्गत कार्य करते.
🌍 भूगोल संदर्भ - माउंट एव्हरेस्ट :
• उंची- 8,849 मीटर (29,032 फूट) - जगातील सर्वोच्च पर्वत शिखर.
• स्थान - हिमालय पर्वतरांगेत नेपाळ आणि चीन (तिबेट) देशांच्या सीमेवर.
• स्थानिक नावे - नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला 'सागरमाथा' (Sagarmatha) आणि तिबेटमध्ये 'चोमोलुंगमा' (Chomolungma) म्हणून ओळखले जाते.
• पहिला यशस्वी चढाई - 1953 मध्ये न्यूझीलंडचे सर एडमंड हिलेरी आणि नेपाळचे तेनझिंग नोर्गे शेर्पा यांनी सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट सर केला होता.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स - Mission Vande Mataram
मिशन वंदे मातरम → BSF च्या महिला तुकडीचे माउंट एव्हरेस्ट सर मोहीम
सोबत राबवलेली पर्यावरण मोहीम → क्लीन हिमालय - क्लीन ग्लेशियर्स.
BSF चे स्थापना वर्ष → 1 डिसेंबर 1965 (मंत्रालय : गृह मंत्रालय)
माउंट एव्हरेस्टची अधिकृत उंची → 8,849 मीटर
माउंट एव्हरेस्टचे नेपाळमधील नाव → सागरमाथा
माउंट एव्हरेस्टचे तिबेटमधील नाव → चोमोलुंगमा

















