
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस
International Day for Biological Diversity
📚 Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी 22 मे रोजी साजरा करण्यात येणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 2026' ची अधिकृत मुख्य संकल्पना (Theme) खालीलपैकी कोणती आहे ?
- बी पार्ट ऑफ द प्लॅन (Be part of the Plan)
- हार्मनी विथ नेचर (Harmony with nature)
- अवर सोल्यूशन्स आर इन नेचर (Our Solutions are in Nature)
- अॅक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट (Acting Locally for Global Impact)
उत्तर : अॅक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट (Acting Locally for Global Impact)
📰 बातमी काय ?
• जगभरात जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी 22 मे 2026 रोजी 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस' (International Day for Biological Diversity) साजरा करण्यात आला.
• या निमित्ताने संयुक्त राष्ट्रे (UN) आणि भागीदार देशांद्वारे विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची घोषणा करण्यात आली.
🧐 'जैवविविधता दिवस' काय आहे ?
• पार्श्वभूमी : पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, सुक्ष्मजीव आणि त्यांची परिसंस्था (Ecosystem) यांच्या संरक्षणाबद्दल मानवामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
• सुरुवात आणि इतिहास - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने (UN General Assembly) डिसेंबर 2000 मध्ये 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून घोषित केला.
🧐 आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 22 मे रोजीच का साजरी करतात ?
• 22 मे 1992 रोजी नैरोबी (केनिया) येथे झालेल्या परिषदेत 'जैविक विविधतेच्या कराराचा' (Convention on Biological Diversity - CBD) मसुदा स्वीकारण्यात आला होता, म्हणूनच 22 मे या तारखेची निवड करण्यात आली.
⛳️ 2026 साठी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाची संकल्पना (थीम) कोणती ?
• "Acting Locally for Global Impact" म्हणजेच "जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती" ही 2026 साठी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाची संकल्पना (थीम) आहे.

🧐 कुन्मिंग-मॉन्ट्रियल ग्लोबल बियोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क (KMGBF) म्हणजे काय ?
• करार - डिसेंबर 2022 मध्ये जागतिक स्तरावर निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी हा ऐतिहासिक करार करण्यात आला.
• मुख्य उद्दिष्ट (30x30 Target) - 2030 पर्यंत जगातील किमान 30% निकृष्ट परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे आणि 30% जमीन, जलस्रोत व समुद्राचे संवर्धन करणे.
• वर्ष 2026 मधील आयोजनामध्ये 'कुनमिंग-मॉन्ट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क' (KMGBF) च्या उद्दिष्टांची वेगाने अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
🇮🇳 भारताचा संदर्भ आणि कायदेशीर चौकट :
• CBD चा सदस्य - भारत हा 'कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी' (CBD) या कराराचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता देश आहे.
• राष्ट्रीय कायदा - भारताने जैवविविधतेच्या संरक्षणासाठी संसदेत 'जैवविविधता कायदा, 2002' (Biological Diversity Act, 2002) संमत केला.
• संस्थात्मक रचना - या कायद्यांतर्गत चेन्नई येथे 'राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण' (NBA - National Biodiversity Authority) ची स्थापना करण्यात आली आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स - International Day for Biological Diversity
• आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस → 22 मे
• 2026 ची थीम → "Acting Locally for Global Impact"
• संबंधित मूळ आंतरराष्ट्रीय करार → कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी (CBD - 1992)
• भारताचा राष्ट्रीय कायदा → जैवविविधता कायदा, 20002 (Biological Diversity Act).
• राष्ट्रीय प्राधिकरणाचे (NBA) मुख्यालय → चेन्नई

















