
चालू घडामोडी | ताडोबा-इंद्रावती वाघ कॉरिडोअर विवाद
Mining Project Amid Tiger Corridor Controversy
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच लोहखनिज खननासाठी वन्यजीव मंजुरीच्या वादामुळे चर्चेत आलेला 'ताडोबा-इंद्रावती वाघ कॉरिडोअर' प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ?
- भंडारा
- गडचिरोली
- नागपूर
- सातारा
उत्तर : गडचिरोली
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील ताडोबा-इंद्रावती वाघ कॉरिडोअर (Tadoba–Indravati Tiger Corridor) क्षेत्रात येणाऱ्या एका मोठ्या लोहखनिज प्रकल्पाला राज्य सरकारने वन्यजीव मंजुरीतून (Wildlife Clearance) सूट दिल्यामुळे हा विषय सध्या तीव्र वादात सापडला आहे.
🤝 वादग्रस्त निर्णय - महाराष्ट्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील 'लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी' (Lloyds Metals & Energy) कंपनीच्या लोहखनिज उत्खनन आणि प्रक्रिया प्रकल्पाला (Iron Ore Mining Project) वन्यजीव मंजुरीतून अधिकृतपणे सूट दिली आहे.

🧐 विवादाचे कारण - अधिकृत नकाशे आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) नोंदींनुसार, हा प्रकल्प थेट 'ताडोबा-इंद्रावती वाघ कॉरिडोअर' या अत्यंत संवेदनशील वन्यजीव क्षेत्रात येत असतानाही ही सूट देण्यात आली आहे.
🧐 प्रकल्पाचे स्वरूप आणि तांत्रिक मंजुरी -
• व्याप्ती - या लोहखनिज प्रकल्पासाठी गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 9.4 चौरस किलोमीटर वनजमीन वळवण्याचा हा प्रस्ताव आहे.
• मिळालेल्या मंजुऱ्या: या प्रकल्पाला 15 एप्रिल 2026 रोजी वन मंजुरी (Forest Clearance) आणि 12 मे 2026 रोजी पर्यावरण मंजुरी (Environmental Clearance) मिळाली आहे.
• सूट देण्याचा आदेश - 13 मे 2026 रोजी महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव रक्षकांनी (Chief Wildlife Warden) या प्रकल्पाला वन्यजीव मंजुरीतून सूट दिली.
• त्यांनी असे कारण दिले की, हा भाग कोणत्याही मान्यताप्राप्त वाघ कॉरिडोअर, अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाजवळ येत नाही.
✍️ विसंगत नोंदी :
1) ताडोबा-इंद्रावती व्याघ्र कॉरिडॉर -
• केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला (MoHFW) सादर केलेल्या नकाशांनुसार, या प्रकल्पातील बहुतांश वनक्षेत्र हे 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण' (NTCA) मान्यताप्राप्त 'व्याघ्र संवर्धन योजने' अंतर्गत ताडोबा-इंद्रावती व्याघ्र कॉरिडॉरचा भाग आहेत.
2) शासकीय स्पष्टीकरण विरुद्ध कंपनीची नोंद -
• 13 मे 2026 रोजी महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी (Chief Wildlife Warden) या प्रकल्पाला वन्यजीव मंजुरीतून सूट दिली आणि हा भाग कोणत्याही व्याघ्र राखीव क्षेत्र, राष्ट्रीय उद्यान किंवा कॉरिडॉरच्या जवळ नसल्याचे सांगितले.
• मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, 'लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी' याच कंपनीने मार्च 2024 मध्ये वन्यजीव मंजुरीसाठी अर्ज करताना स्वतः या जागेचा उल्लेख 'व्याघ्र कॉरिडॉर' (Tiger Corridor) असा केला होता. या दोन्ही परस्परविरोधी नोंदींमुळे कायदेशीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
🐅🐅 संकल्पना - 'वाघ कॉरिडोअर' म्हणजे काय ?
• वाघ कॉरिडोअर (व्याघ्र कॉरिडोअर) म्हणजे दोन किंवा अधिक व्याघ्र प्रकल्पांना (Tiger Reserves) किंवा जंगलांना जोडणारा एक असा नैसर्गिक जमिनीचा पट्टा, ज्याचा वापर करून वाघ कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एका जंगलातून दुसऱ्या जंगलात सुरक्षितपणे प्रवास करू शकतात.
⛳️ ताडोबा-इंद्रावती कॉरिडोअर का महत्त्वाचा आहे ?
• हा कॉरिडोअर महाराष्ट्रातील 'ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प' (चंद्रपूर/गडचिरोली) आणि छत्तीसगडमधील 'इंद्रावती व्याघ्र प्रकल्प' यांना जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण दुवा आहे.
• हा भाग वाघांच्या अनुवांशिक विविधतेसाठी (Genetic Diversity) आणि त्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो.
🏛️ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) बद्दल माहिती :
• स्थापना : डिसेंबर 2005 मध्ये 'टायगर टास्क फोर्स'च्या (Tiger Task Force) शिफारशीवरून या संस्थेची स्थापना करण्यात आली.
• वैधानिक दर्जा - 'वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2006' (Wildlife Protection Amendment Act, 2006) अंतर्गत NTCA ला वैधानिक (कायदेशीर) दर्जा देण्यात आला.
• भूमिका - भारतात 'प्रकल्प वाघ' (Project Tiger) ची अंमलबजावणी आणि प्रशासन पाहणारी ही देशातील सर्वोच्च शिखर संस्था (Apex Body) आहे.
परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• लोहखनिज खाणकामाचा वादग्रस्त प्रकल्प → लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी (गडचिरोली)
• बाधित होणारा मुख्य व्याघ्र मार्ग → ताडोबा-इंद्रावती व्याघ्र कॉरिडॉर
• प्रकल्पासाठी वळवण्यात येणारे वनक्षेत्र → 9.4 चौरस किमी
• राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) स्थापना → डिसेंबर 2005
• वैधानिक दर्जा - 'वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2006
























