
चालू घडामोडी | आवश्यक वस्तू अधिनियम, 1955

Essential Commodities Act , 1955
Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोणता कायदा लागू केला ?
1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
2. आवश्यक वस्तू अधिनियम
3. ग्राहक संरक्षण अधिनियम
4. स्पर्धा कायदा
उत्तर : आवश्यक वस्तू अधिनियम
📰 बातमी काय ?
• इराण संदर्भातील भू-राजकीय तणावामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 लागू केला.
• याचा मुख्य उद्देश म्हणजे आवश्यक वस्तूंची उपलब्धता कायम ठेवणे आणि किंमती नियंत्रणात ठेवणे.
🧐 आवश्यक वस्तू अधिनियम, हा कायदा नेमका काय आहे ?
• आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 (Essential Commodities Act , 1955) हा असा कायदा आहे जो लोकांना जीवनावश्यक वस्तू (अन्नधान्य, तेल, इ.) योग्य दरात आणि पुरेशा प्रमाणात मिळाव्यात यासाठी तयार करण्यात आला आहे.
• साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे या कायद्या अंतर्गत व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा (Stock Limits) लादू शकतात.
• उद्देश : या कायद्याचा मुख्य उद्देश काही विशिष्ट वस्तूंचा (अत्यावश्यक वस्तू) पुरवठा टिकवून ठेवणे, त्यांचे वितरण सुरळीत करणे आणि ग्राहकांना त्या न्याय्य दरात उपलब्ध करून देणे हा आहे.
📍 उदाहरणार्थ -
• साठेबाजी रोखणे : जर एखाद्या व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणात डाळ साठवून ठेवली आणि बाजारात कमी पुरवठा केला, तर किंमत वाढते. अशावेळी सरकार हा कायदा वापरून त्याच्यावर कारवाई करू शकते.
⚙️ सरकार या कायद्याखाली काय करू शकते ?
• कोणती वस्तू आवश्यक आहे हे ठरवू शकते
• साठ्याची मर्यादा (Stock limit) ठरवू शकते
• किंमती नियंत्रणात ठेवू शकते
• नियम मोडल्यास दंड आणि तुरुंगवास देऊ शकते
📋 हा कायदा नेमका कधी आणि का लागू केला जातो ?
• हा कायदा रोजच्या परिस्थितीत वापरला जात नाही.
• तो फक्त असामान्य परिस्थितीत लागू केला जातो, जेव्हा बाजार बिघडण्याची शक्यता असते. जसे की -
1) युद्ध / ऊर्जा संकट :
• उदाहरणार्थ- सध्याच्या परिस्थितीत इराणसंबंधी तणावामुळे इंधन पुरवठा कमी होऊ शकतो.
• जर व्यापारी पेट्रोल-डिझेल साठवून ठेवू लागले, तर किंमती वाढतील — ते टाळण्यासाठी सरकार हस्तक्षेप करते.
2) नैसर्गिक आपत्ती (पूर, महामारी) :
• उदाहरणार्थ- COVID-19 काळात मास्क आणि सॅनिटायझर अचानक महाग झाले.
• सरकारने हा कायदा वापरून त्यांची किंमत नियंत्रणात ठेवली.
3) अचानक किंमत वाढ (Price Rise) :
• उदाहरणार्थ - कांद्याच्या किंमती अचानक वाढल्या तर व्यापारी जास्त नफा मिळवण्यासाठी साठेबाजारी करतात.
सरकार stock limit लावून बाजार स्थिर करते.
🎯 हा कायदा का महत्त्वाचा आहे ?
• गरीब आणि सामान्य लोकांना वस्तू परवडणाऱ्या दरात मिळतात
• कृत्रिम तुटवडा (Artificial scarcity) निर्माण होण्यापासून बचाव होतो
• बाजारात स्थिरता राहते
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• आवश्यक वस्तू अधिनियम → 1955
• उद्देश → साठेबाजी रोखणे + किंमत नियंत्रण करणे
• अधिकार → Stock limit + Price control
• लागू परिस्थिती → युद्ध / आपत्ती / किंमत वाढ
• नियंत्रण → केंद्र सरकार





















