
चालू घडामोडी | बालविवाहमुक्त भारत अभियान

Bal Vivah Mukt Bharat Campaign
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारत सरकारने बालविवाह पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षासाठी निश्चित केले आहे ?
1. 2026
2. 2028
3. 2030
4. 2035
उत्तर : 2030
बातमी काय ?
• भारत सरकारने बालविवाहमुक्त भारत अभियान (Bal Vivah Mukt Bharat Campaign) अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
• या अभियानाचा उद्देश 2026 पर्यंत बालविवाहाचे प्रसाराचे प्रमाण (Prevalence) 10% ने कमी करणे आणि
• 2030 पर्यंत भारताला पूर्णपणे बालविवाहमुक्त बनवणे हा आहे.
• या उपक्रमात कायद्याची अंमलबजावणीबरोबरच समुदाय-आधारित अंमलबजावणी (Community Driven Enforcement)
• आणि जनजागृती यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
बालविवाह गंभीर सामाजिक समस्या का आहे ?
• बालविवाह ही केवळ सामाजिक परंपरा नसून तो मानवी हक्कांचा भंग (Human Rights Violation) आहे.
• लहान वयात लग्न झाल्यामुळे मुलींचे शिक्षण अपूर्ण राहते, त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि लैंगिक शोषणाचा धोका वाढतो.
• यामुळे मातामृत्यू, बालमृत्यू आणि गरिबीचे दुष्टचक्र अधिक तीव्र होते.
बालविवाह म्हणजे काय ?
• भारतीय कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलगी किंवा 21 वर्षांखालील मुलगा यांचा झालेला विवाह म्हणजे बालविवाह (Child Marriage) होय.
• असा विवाह कायद्याने बेकायदेशीर मानला जातो.

भारतातील बालविवाहविरोधी लढ्याची पार्श्वभूमी :
• भारतामध्ये बालविवाहाविरोधातील चळवळ 19व्या शतकात सुरू झाली.
• राजा राममोहन रॉय, ईश्र्वरचंद्र विद्यासागर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या समाजसुधारकांनी बालविवाहाविरोधात समाजप्रबोधन केले.
भारतातील बालविवाहविरोधी कायद्यांची पार्श्वभूमी :
संमती वय कायदा 1891 (Age of Consent Act, 1891) :
• 1891 मधील संमती वय कायदा हा बालविवाह रोखण्यासाठीचा पहिला कायदेशीर प्रयत्न होता.
शारदा कायदा 1929 :
• 1929 च्या बालविवाह प्रतिबंधक कायदा – शारदा कायदा (Child Marriage Restraint Act) यामुळे मुलींसाठी 14 वर्षे व मुलांसाठी 18 वर्षे विवाहाचे किमान वय निश्चित करण्यात आले.
1948 व 1978 दुरुस्ती :
• 1948 व 1978 च्या दुरुस्त्यांनंतर मुलींसाठी 18 वर्षे व मुलांसाठी 21 वर्षे ही मर्यादा वाढविण्यात आली.
बालविवाह प्रतिबंधक कायदा (Prohibition of Child Marriage Act, 2006) :
• 2006 मध्ये लागू झालेल्या बालविवाह प्रतिबंधक कायदा (Prohibition of Child Marriage Act – PCMA) यामुळे प्रतिबंध, संरक्षण आणि शिक्षा यांना कायदेशीर बळ मिळाले.
सध्याची कायदेशीर चौकट :
बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 (PCMA) :
• PCMA नुसार बालविवाह रद्द करता येण्याजोगा (Voidable) असतो,
• तर जबरदस्ती, फसवणूक किंवा तस्करीच्या प्रकरणात तो पूर्णतः अवैध (Void) ठरतो.
• या कायद्यानुसार बालविवाह प्रतिबंध अधिकारी (Child Marriage Prohibition Officer – CMPO) नेमण्याची तरतूद आहे.
भारतीय न्याय संहिता, 2023 (Bharatiya Nyaya Sanhita, 2023) :
• भारतीय न्याय संहिता, 2023 नुसार 18 वर्षांखालील पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे हा बलात्कार मानला जातो.
POCSO Act, 2012 :
• लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 (POCSO Act) अंतर्गत बालविवाहातील लैंगिक संबंधांना गंभीर लैंगिक अत्याचार (Aggravated Sexual Assault) म्हणून हाताळले जाते.
भारताची अधिकृत उद्दिष्टे :
• भारत सरकारने 2026 पर्यंत बालविवाहाचे प्रमाण 10% ने कमी करण्याचे आणि
• 2030 पर्यंत बालविवाह पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
• हे उद्दिष्ट United Nations च्या शाश्वत विकास उद्दिष्ट 5.3 (Sustainable Development Goal 5.3) शी सुसंगत आहे.
• यासाठी जिल्हा व पंचायत पातळीवर बालविवाहमुक्त क्षेत्र (child marriage free area) घोषित करण्यावर भर देण्यात येत आहे.
सध्याची स्थिती : आकडे काय सांगतात ?
• राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण–5 (National Family Health Survey–5, 2019–21) यानुसार 20 ते 24 वयोगटातील 23% महिलांचे लग्न 18 वर्षांपूर्वी झालेले आहे.
• गेल्या काही वर्षांत प्रमाण कमी झाले असले तरी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश तसेच मध्य व पूर्व भारतातील काही भागांत बालविवाहाचे प्रमाण अजूनही जास्त आहे.


















_1769824977764.webp)