
चालू घडामोडी | PSLV-C62 मिशन

PSLV-C62 Mission
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) PSLV-C62 मोहिमेद्वारे ISRO कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे ?
1. Anvesha
2. Aditya-L2
3. Mangal
4. Kalam
उत्तर : Anvesha (EOS-N1)
बातमी काय ?
• भारताची अंतराळ संस्था Indian Space Research Organisation (ISRO) 2026 ची सुरुवात PSLV-C62 मिशनने करणार आहे.
• या मोहिमेद्वारे EOS-N1 (कोडनेम Anvesha) हा प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह श्रीहरिकोटा येथून PSLV-C62 रॉकेटद्वारे जानेवारी 2026 मध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे.
• या मोहिमेत EOS-N1 सोबत 18 सह-प्रवासी (Co-Passenger) उपग्रह देखील अवकाशात सोडले जाणार आहेत.
EOS-N1 (Anvesha) म्हणजे काय ?
• EOS-N1 (Anvesha) हा प्रगत पृथ्वी निरीक्षण (Earth Observation) उपग्रह आहे.
• तो Hyperspectral Imaging तंत्रज्ञानावर आधारित असून भारताच्या रणनीतिक (defence) तसेच नागरी गरजांसाठी विकसित करण्यात आला आहे.
• हा उपग्रह जमिनीवरील घटकांचे अतिशय सूक्ष्म आणि अचूक निरीक्षण करण्यास सक्षम आहे.
प्रक्षेपण कधी व कुठून ?
• प्रक्षेपण तारीख : जानेवारी 2026
• प्रक्षेपण रॉकेट : Polar Satellite Launch Vehicle – PSLV-C62
• प्रक्षेपण केंद्र : श्रीहरिकोटा
EOS-N1 चे मुख्य उद्दिष्ट कोणते ?
• भारताची अवकाशाधारित नजर ठेवण्याची आणि माहिती गोळा करण्याची क्षमता वाढवणे हा आहे.
• त्याचबरोबर शेती, शहर नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण निरीक्षणासाठीही हा उपग्रह वापरात येणार आहे.
EOS-N1 ची मुख्य कार्ये कोणते ?

हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग (Hyperspectral Imaging) :
• हा उपग्रह Hyperspectral Imaging वापरून जमिनीवरील घटक वेगवेगळ्या तरंगलांबींमध्ये ओळखतो, त्यामुळे माहिती अधिक अचूक मिळते.
धोरणात्मक पाळत ठेवणे (Strategic Surveillance) :
• तो सीमा निरीक्षण, भूभाग विश्लेषण आणि संभाव्य धोके ओळखणे यासाठी उपयोगी ठरतो.
शहरी आणि पायाभूत सुविधा (Urban and infrastructure) :
• शहरांमध्ये जमिनीचा वापर, इमारती व पायाभूत सुविधा निरीक्षण करण्यासाठी वापरला जातो.
कृषी ( Agriculture) :
• शेती क्षेत्रात पिकांची तब्येत, मातीतील ओलावा आणि उत्पादनाचा अंदाज घेण्यास मदत करतो.
पर्यावरण (Environment) :
• पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण, परिसंस्थेतील बदल आणि हवामानाशी संबंधित परिणाम नोंदवतो.
Anvesha (EOS-N1 ) या उपग्रहाचे महत्त्व (Significance) :
• हा उपग्रह दर्शवतो की भारत Hyperspectral Remote Sensing या अत्याधुनिक तंत्रज्ञानात आता प्रगत देशांच्या रांगेत पोहोचला आहे.
• एकाच उपग्रहातून संरक्षण, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण प्रशासन या सर्व क्षेत्रांना मदत मिळणार आहे.


_1769824977764.webp)


















