
चालू घडामोडी | राष्ट्रीय पक्षी दिवस 2026

National Bird Day 2026
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2026 मध्ये राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?
1. 1 जानेवारी
2. 3 जानेवारी
3. 5 जानेवारी
4. 10 जानेवारी
उत्तर : 5 जानेवारी
बातमी काय ?
• राष्ट्रीय पक्षी दिवस हा दिवस 5 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणजे काय ?
• राष्ट्रीय पक्षी दिवस (National Bird Day) हा पक्षी कल्याण व संवर्धनासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय दिवस आहे.
• या दिवशी जंगली पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवण्यास विरोध, नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि मानव–वन्यजीव सहअस्तित्व यावर भर दिला जातो.
राष्ट्रीय पक्षी दिवस हा दिवस का साजरा केला जातो ?
• पक्षी पर्यावरणातील परागीभवन, कीड नियंत्रण आणि परिसंस्थेचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
• मात्र अधिवास नष्ट होणे, हवामान बदल, प्रदूषण आणि बेकायदेशीर व्यापार यामुळे जगभरात पक्ष्यांची संख्या घटत आहे.
• हीच चिंता लक्षात घेऊन राष्ट्रीय पक्षी दिवस (National Bird Day) साजरा केला जातो.
• या निमित्ताने पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांच्यासमोरील धोके आणि संवर्धनाची गरज याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
राष्ट्रीय पक्षी दिवसाची सुरुवात केव्हा आणि कोणी केली ?
• हा दिवस सर्वप्रथम अमेरिकेत साजरा करण्यास सुरुवात झाली.
• राष्ट्रीय पक्षी दिवसाची सुरुवात 2002 मध्ये एव्हियन वेलफेअर कोलिशन (Avian Welfare Coalition या संस्थेने केली.
• इतिहासकारांच्या मते, 5 जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे हा दिवस अमेरिकेत वार्षिक ख्रिसमस बर्ड काउंट (Christmas Bird Count) या पक्षी सर्वेक्षणाचा ही दिवस आहे.
• पक्ष्यांच्या शोषणाविरोधात आणि दीर्घकालीन संवर्धन आव्हानांबाबत जागृती हा यामागचा उद्देश आहे.
राष्ट्रीय पक्षी दिवसाचे महत्त्व :
• पक्षी हे पर्यावरणीय आरोग्याचे निर्देशक (Environmental Indicators) मानले जातात.
• त्यांची घटती संख्या म्हणजे परिसंस्थेतील बिघाडाचा इशारा असतो.
• म्हणून हा दिवस अधिवास संरक्षण, जबाबदार मानवी वर्तन आणि जैवविविधता जपण्याचा संदेश देतो.
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
• भारताचा राष्ट्रीय पक्षी भारतीय मोर(Indian Peacock) हा आहे.
• याचे वैज्ञानिक नाव पावो क्रिस्टेटस (Pavo Cristatus) हे आहे.
• 1963 साली सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वामुळे मोराला राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आले.

भारताचे पक्षिप्रेमी म्हणून कोणास ओळखले जाते ?
Who is known as the Birdman of India ?
• डॉ. सलीम अली हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी पक्षीशास्त्राची (Ornithology) पद्धतशीर व शास्त्रीय मांडणी केली.
• डॉ. सलीम अली यांच्या आधी भारतात पक्षीविविधतेबाबत सुसंगत आणि वैज्ञानिक माहिती उपलब्ध नव्हती.
• त्यांच्या सखोल अभ्यासामुळे भारतातील पक्षीवैविध्य जगासमोर आले.
• पक्ष्यांवरील त्यांच्या तज्ज्ञतेमुळे आणि निसर्गसंवर्धनासाठी केलेल्या कार्यामुळे डॉ. सलीम अली यांना “भारताचे पक्षिप्रेमी (Birdman of India)” म्हणून ओळखले जाते.
• जगभरातील पक्षीशास्त्रज्ञांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.
• British Ornithologists’ Union ने त्यांना 1967 साली सुवर्णपदक देऊन सन्मानित केले आणि डॉ. सलीम अली हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहे.


























