
चालू घडामोडी | नवे बोधचिन्ह आणि नवे मॅस्कॉट “सांख्यिकी”

New logo & Mascot “सांख्यिकी”
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आपले नवे बोधचिन्ह (Logo) आणि नवे मॅस्कॉट सादर केले ?
1. वित्त मंत्रालय
2. सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालय
3. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
4. माहिती व प्रसारण मंत्रालय
उत्तर : सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालय (Ministry of Statistics & Programme Implementation)
बातमी काय ?
• सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाने (Ministry of Statistics & Programme Implementation) 1 जानेवारी 2026 रोजी आपले नवे बोधचिन्ह (Logo) आणि नवे मॅस्कॉट “सांख्यिकी” यांचे अनावरण केले आहे.
• हा निर्णय मंत्रालयाची संस्थात्मक ओळख आधुनिकीकरण, सार्वजनिक संवाद वाढवणे आणि राष्ट्र उभारणीत अधिकृत आकडेवारीची भूमिका बळकट करण्यासाठी घेण्यात आलेला महत्त्वाचा टप्पा आहे.
नव्या बोधचिन्हाचा अर्थ व संदेश :
• नवे बोधचिन्ह भारताच्या विकास प्रक्रियेत माहिती व आकडेवारीचे महत्त्व अधोरेखित करते.
• हे बोधचिन्ह मंत्रालयाची डेटा-चालित प्रशासन, पारदर्शकता आणि विकासासाठीची वचनबद्धता दर्शवते.
• या बोधचिन्हामागे भारताचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक सांख्यिकीय विज्ञान या दोन्हींची प्रेरणा आहे.
• यामधून मंत्रालयाचा “विकासासाठी डेटा ” (Data for Development) हा मुख्य संदेश व्यक्त होतो.

बोधचिन्हातील प्रमुख प्रतीकांचे महत्त्व :
• बोधचिन्हामधील अशोक चक्र सत्य, पारदर्शकता आणि सुशासन (truth, transparency, and good governance) यांचे प्रतीक आहे.
• मध्यभागी असलेले रुपयाचे चिन्ह (₹) आर्थिक नियोजन, धोरणनिर्मिती आणि राष्ट्रीय विकासात आकडेवारीची महत्त्वाची भूमिका दर्शवते.
• यामधील विविध संख्या आणि चिन्हे, आधुनिक माहिती प्रणाली आणि सांख्यिकी विज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात.
नवे मॅस्कॉट “सांख्यिकी” म्हणजे काय ?
• मंत्रालयाने “सांख्यिकी” नावाने नवे मॅस्कॉट सादर केले.
• “सांख्यिकी” मॅस्कॉट हे एक मैत्रीपूर्ण आणि नागरिक-केंद्री स्वरूपाचे पात्र आहे.
• याचा उद्देश सांख्यिकीय माहिती सामान्य नागरिकांसाठी सोपी, समजण्याजोगी आणि आकर्षक बनवणे हा आहे.
“सांख्यिकी” मॅस्कॉटचे महत्त्व व उपयोग :
• “सांख्यिकी” हा मॅस्कॉट अचूकता, पारदर्शकता आणि डेटा-चालित प्रशासन या मंत्रालयाच्या मुख्य मूल्यांचे प्रतीक आहे.
• तो जटिल सांख्यिकीय संकल्पना सोप्या व दृश्य स्वरूपात स्पष्ट करण्यास मदत करतो.
• हा मॅस्कॉट राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSO) जनजागृती मोहिमा, शैक्षणिक साहित्य, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मंत्रालयाची अधिकृत ओळख म्हणून वापरला जाणार आहे.
• यामुळे अधिकृत आकडेवारीवरील लोकांचा विश्वास वाढवणे आणि लोकसहभाग प्रोत्साहित करणे हा उद्देश साध्य होणार आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• मंत्रालय : सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालय (MoSPI)
• लॅान्च दिनांक : 1 जानेवारी 2026
• लॅान्च : बोधचिन्ह + मॅस्कॉट “सांख्यिकी”
• थीम : Data for Development
• उद्देश : पारदर्शकता, डेटा-आधारित निर्णय, लोकसहभाग






















