
चालू घडामोडी | नायमेसुलाइड

Nimesulide
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 मधील कलम 26A अंतर्गत केंद्र सरकारने अलीकडे कोणत्या औषधाच्या 100 mg पेक्षा जास्त तोंडी (Oral) स्वरूपावर बंदी घातली आहे ?
1. पॅरासिटामॉल
2. नायमेसुलाइड
3. आयबूप्रोफेन
4. ॲस्पिरिन
उत्तर : नायमेसुलाइड (Nimesulide)
बातमी काय ?
• केंद्र सरकारने नायमेसुलाइड (Nimesulide) या औषधाच्या 100 mg पेक्षा जास्त तोंडी स्वरूपाच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी घातली आहे.
• ही कारवाई औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 मधील कलम 26A अंतर्गत करण्यात आली आहे.
नायमेसुलाइड म्हणजे काय ?
• नायमेसुलाइड हे वेदना आणि ताप कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे.
• हे NSAID (Non-Steroidal Anti-Inflammatory Drug) या गटात मोडते.
• शरीरात वेदना व सूज निर्माण करणाऱ्या रासायनिक घटकांवर परिणाम करून हे औषध काम करते.
• सामान्यतः याचा वापर अल्पकालीन उपचारासाठीच करणे अपेक्षित असते.
नायमेसुलाइड या औषधाशी संबंधित आरोग्याचा धोका कोणता ?
• नायमेसुलाइडचा जास्त डोस किंवा दीर्घकाळ वापर केल्यास यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
• काही रुग्णांमध्ये यामुळे लिव्हर एन्झाइम्स वाढणे,
• तर काही प्रकरणांमध्ये लिव्हर फेल्युअरचा धोका देखील आढळून आला आहे.
• म्हणूनच या औषधाला हेपॅटो-टॉक्सिक (यकृतास अपायकारक) मानले जाते.
बंदी का घालण्यात आली ?
• सरकारच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालानुसार, -
• 100 mg पेक्षा जास्त तोंडी मात्रेतील नायमेसुलाइड मानवी आरोग्यास सुरक्षित नाही.
• जास्त मात्रेमुळे मानवी आरोग्यास, विशेषतः यकृताला (लिव्हर) गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
• याचबरोबर बाजारात याच उद्देशासाठी अधिक सुरक्षित वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत.
• त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या औषधावर बंदी घालणे आवश्यक ठरले.
कलम 26A चे महत्त्व :
• औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 मधील कलम 26A (Section 26A of the Drugs and Cosmetics Act, 1940) केंद्र सरकारला असा अधिकार देते की,-
• " कोणतेही औषध मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आल्यास, त्याचे उत्पादन, विक्री व वितरण तात्काळ बंद करता येते."
या निर्णयाचे महत्त्व (Significance) :
• या निर्णयामुळे भारतातील औषध सुरक्षेची यंत्रणा अधिक मजबूत होईल.
• रुग्णांमध्ये औषधांमुळे होणाऱ्या यकृताच्या आजारांचा धोका कमी होईल.
• डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही योग्य व सुरक्षित औषधमात्रेचे पालन करण्याचा संदेश मिळेल.
• एकूणच हा निर्णय सार्वजनिक आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे.















