
चालू घडामोडी | महापारेषण आणि महानिर्मिती सामंजस्य करार

MahaPareshan and MahaNirmiti signed a MoU
Subject : GS - सरकारी योजना (उपक्रम) - महाराष्ट्र राज्य
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामागील मुख्य उद्देश काय ?
1. राज्यातील वीज निर्मिती प्रकल्पांची संख्या वाढवणे
2. 765 kV क्षमतेच्या वीज पारेषण प्रकल्पांसाठी संयुक्तपणे निविदा सादर करणे
3. घरगुती वीज दरात तात्काळ कपात करणे
4. सौरऊर्जा धोरणात बदल करणे
उत्तर : 765 kV क्षमतेच्या वीज पारेषण प्रकल्पांसाठी संयुक्तपणे निविदा सादर करणे
बातमी काय ?
• राज्यातील वीज वहन यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये (महानिर्मिती) सामंजस्य करार झाला.

महापारेषण आणि महानिर्मिती सामंजस्य करार नेमका काय ?
• महापारेषण आणि महानिर्मिती, 765 KV क्षमतेच्या पारेषण प्रकल्पासाठी ‘टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग’ (TBCB) अंतर्गत संयुक्तपणे निविदा सादर करण्याचा निर्णय दोन्ही वीज कंपन्यांनी घेतला.
• यामुळे प्रकल्प कमी खर्चात, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होईल.
दोन शासकीय कंपन्यांचा समन्वय महत्त्वाचा का ?
• महापारेषणचा वीज पारेषण क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव
• महानिर्मितीची मोठ्या वीज प्रकल्प राबविण्याची तांत्रिक क्षमता
• या दोन्ही क्षमतांचा एकत्रित उपयोग होऊन उच्च क्षमतेचे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवता येतील.
या प्रकल्पाचे महत्त्व काय ?
बळकट वीज ग्रीड :
• नवीन प्रकल्पांमुळे वीज वहन क्षमता वाढेल
• यामुळे राज्याचा ग्रिड अधिक स्थिर व विश्वासार्ह बनेल
शासकीय कंपन्यांची स्पर्धात्मकता :
• महापारेषण आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त सहभागामुळे प्रकल्प खर्चात बचत होईल.
• अंमलबजावणी गुणवत्तेत वाढ होईल.
भविष्यातील गरज :
• वाढती वीज मागणी लक्षात घेता 765 kV यंत्रणा ‘Power Corridor’चा कणा ठरणार
• दीर्घकालीन ऊर्जा नियोजनासाठी महत्त्वाचे पाऊल















