
चालू घडामोडी | महाराष्ट्र शासनाचा ‘प्रोजेक्ट महादेवा’ काय आहे ?

What is 'Project Mahadeva' of the Maharashtra Government ?
Subject : GS - सरकारी योजना - महाराष्ट्र राज्य
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा उपक्रम महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यतः कशासाठी राबविण्यात येत आहे ?
1. राज्यात सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी
2. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनासाठी
3. ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापन व जलसंधारणासाठी
4. 13 वर्षांखालील फुटबॉल खेळाडूंचा शोध घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
उत्तर : 13 वर्षांखालील फुटबॉल खेळाडूंचा शोध घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
बातमी काय ?
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ मुंबई येथील वानखेडे स्टेडियम येथे करण्यात आला.

प्रोजेक्ट महादेवा काय आहे ?
• हा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम आहे.
• संपूर्ण महाराष्ट्रात 13 वर्षांखालील (U-13) फुटबॉल खेळाडूंची निवड व घडण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
• या उपक्रमाचा उद्देश राज्यातील 13 वर्षांखालील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे हा आहे.
प्रोजेक्ट महादेवा प्रकल्प कोणत्या संस्थांच्या सहकार्याने राबविला जात आहे ?
• महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग
• महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (Maharashtra Institution for Transformation - MITRA)
• व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (Village Social Transformation Foundation - VSTF)
• वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (Western India Football Association -WIFA)
• शहर व औद्योगिक विकास महामंडळ (City and Industrial Development Corporation -CIDCO)

निवड प्रक्रिया व लाभ :
• एकूण 60 खेळाडूंची निवड केली जाईल - 30 मुले आणि 30 मुली
• निवड झालेल्या खेळाडूंना -
- 5 वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती
- परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण
- शारीरिक, मानसिक व क्रीडा कौशल्य आणि सर्वांगीण विकासाची संधी
प्रोजेक्ट महादेवा चे महत्त्व :
• महाराष्ट्रातील फुटबॉलसाठी दीर्घकालीन टॅलेंट पाइपलाईन तयार होणार
• ग्रामीण व शहरी भागातील गुणवान खेळाडूंना समान संधी
• राज्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमध्ये ओळख मिळण्यास मदत













