
चालू घडामोडी | 62वा सशस्त्र सीमा दल स्थापना दिन

62nd Raising Day of Sashastra Seema Bal
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सशस्त्र सीमा दल (SSB) चा स्थापना दिवस (Raising Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 7 मे
2. 2 डिसेंबर
3. 20 डिसेंबर
4. 1 जानेवारी
उत्तर : 20 डिसेंबर
बातमी काय ?
• दरवर्षी 20 डिसेंबर रोजी सशस्त्र सीमा दल (SSB) चा स्थापना दिन (Raising Day) साजरा केला जातो.
• या दिवशी SSB च्या जवानांच्या सेवा, शौर्य आणि सीमा सुरक्षेतील योगदानाचा गौरव केला जातो.
SSB बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• सशस्त्र सीमा दल हे एक केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (Central Armed Police Force) आहे जे नेपाळ आणि भूतानसह भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्यासाठी जबाबदार आहे.
• स्थापना : 1962 मध्ये चीनच्या आक्रमणानंतर, 1963 मध्ये स्पेशल सर्विस ब्युरो (Special Service Bureau) म्हणून या दलाची स्थापना करण्यात आली.
• सीमा : भारताच्या नेपाळ (1,751 किमी) आणि भूतान (699 किमी) सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी SSB कडे आहे.
• मंत्रालय : SSB हे दल गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अखत्यारीत कार्यरत आहे.
SSB ची मुख्य जबाबदारी :
• सीमांवर घुसखोरी आणि तस्करी रोखणे
• मानव तस्करी व बेकायदेशीर स्थलांतर थांबवणे
• राष्ट्रविरोधी हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्या थांबवणे.
• सीमा सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती गोळा करणे
• सीमावर्ती नागरिकांसाठी नागरी कृती, मदत व विकास कामे करणे
• आपत्तीच्या वेळी मदतकार्य करणे
SSB बद्दल परीक्षेसाठी IMP प्रशासकीय माहिती :
• मंत्रालय : गृह मंत्रालय
• मुख्यालय : नवी दिल्ली
• प्रमुख : महासंचालक (Director General)
• ब्रीदवाक्य : सेवा, सुरक्षा, बन्धुत्व (Service, Security, Brotherhood)
सशस्त्र सीमा दला संदर्भात महत्त्वाची वैशिष्ट्ये व गौरव :
• सशस्त्र सीमा दल हे पहिले केंद्रीय अर्धसैनिक दल आहे ज्याने आपल्या रँकमध्ये महिलांचा समावेश केला.
• 2004 मध्ये सशस्त्र सीमा दलास President’s Colours प्रदान करण्यात आला.
• President’s Colours हा कोणत्याही लष्करी तुकडीला दिले जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.















