
चालू घडामोडी | DHRUV64 म्हणजे काय ?

What is DHRUV64?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे चर्चेत असलेला DHRUV64 हा मायक्रोप्रोसेसर खालीलपैकी कशासाठी ओळखला जातो ?
1. भारतातील पहिला 32-bit ARM आधारित प्रोसेसर
2. भारताचा पहिला 64-bit, 1.0 GHz, ड्युअल-कोअर स्वदेशी मायक्रोप्रोसेसर
3. उपग्रहांसाठी वापरला जाणारा विदेशी प्रोसेसर
4. फक्त मोबाइलसाठी विकसित केलेला चिपसेट
उत्तर : भारताचा पहिला 64-bit, 1.0 GHz, ड्युअल-कोअर स्वदेशी मायक्रोप्रोसेसर
बातमी काय ?
• भारताने DHRUV64 नावाचा आपला पहिला स्वदेशी 64-bit, 1.0 GHz, ड्युअल-कोअर मायक्रोप्रोसेसर विकसित केला आहे.
• हा प्रोसेसर Digital India RISC-V (DIR-V) Programme अंतर्गत तयार करण्यात आला आहे.
DHRUV64 म्हणजे काय ?
• DHRUV64 हा RISC-V open-source architecture वर आधारित 64-bit ड्युअल-कोअर मायक्रोप्रोसेसर आहे.
• हा प्रोसेसर रणनीतिक (Strategic) आणि व्यापारी (Commercial) दोन्ही वापरासाठी उपयुक्त आहे.
• DHRUV64 च्या लाँचिंगसह भारताने आपल्या सेमीकंडक्टर प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

DHRUV64 कोणी विकसित केला ?
• डिझाइन : Centre for Development of Advanced Computing (C-DAC)
• मार्गदर्शन : Ministry of Electronics and Information Technology (MeitY)
• कार्यक्रम : Microprocessor Development Programme (MDP)
मायक्रोप्रोसेसरचे विकासामागील उद्दिष्टे आणि महत्त्व :
• मायक्रोप्रोसेसर हे मोबाइल, संगणक, वाहनं, वैद्यकीय उपकरणे, संरक्षण प्रणाली आणि उपग्रहांचे मेंदू असतात.
• भारतासाठी ही मूलभूत तंत्रज्ञान स्वतःकडे असणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी होते.
• तसेच, यामुळे भारताची इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था अधिक मजबूत व आत्मनिर्भर बनते.
• आत्मनिर्भर भारत उपक्रमाला सेमीकंडक्टर क्षेत्रात चालना मिळेल.
• संशोधन, स्टार्टअप्स व प्रोटोटायपिंगसाठी कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध होतील.
DHRUV64 ची मुख्य वैशिष्ट्ये :
• 1.0 GHz क्लॉक स्पीड
• 64-bit ड्युअल-कोअर आर्किटेक्चर
• मल्टीटास्किंगसाठी अधिक कार्यक्षम
• बाह्य हार्डवेअर सिस्टीमशी सुसंगत
DHRUV64 वापर कोण- कोणत्या क्षेत्रात होईल ?
• 5G तंत्रज्ञान
• ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स
• इंडस्ट्रियल ऑटोमेशन
• Internet of Things (IoT)
• ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स














