
चालू घडामोडी | BRICS 2026 अध्यक्ष कोण ?

Who is the President of BRICS 2026?
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) BRICS संघटनेचे 2026 सालासाठी अध्यक्षपद कोणत्या देशाकडे असेल ?
1. ब्राझील
2. रशिया
3. चीन
4. भारत
उत्तर : भारत
बातमी काय ?
• ब्राझीलने अधिकृतपणे BRICS संघटनेचे 18वे अध्यक्षपद (2026) भारताकडे सोपवले आहे.
• जागतिक व्यापारातील तणाव आणि भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ही जबाबदारी सांभाळणार आहे.

BRICS अध्यक्षपद म्हणजे काय ?
• BRICS मध्ये अध्यक्षपद दरवर्षी बदलते
• 2026 मध्ये भारत BRICS चा अध्यक्ष (Chair) म्हणून काम करेल.
• अध्यक्षपदाचा कालावधी - 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असा असेल.
BRICS अध्यक्षपद कसे ठरते ?
• BRICS अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जात नाही.
• हे अध्यक्षपद वार्षिक फेरपालटीने (rotation) दिले जाते.
BRICS अध्यक्ष देशाची भूमिका काय असते ?
• अध्यक्ष देश म्हणून भारत त्या वर्षासाठी BRICS चा अजेंडा आणि प्राधान्यक्रम ठरवेल
• विविध बैठका आयोजित करेल.
• वार्षिक BRICS शिखर परिषद आयोजित करेल.
• शेरपा, मंत्री आणि नेत्यांच्या पातळीवरील सर्व बैठकींचे अध्यक्षस्थान भूषवेल.
भारताच्या BRICS अध्यक्षपदाचे महत्त्व काय ?
• भारताला विकास वित्तपुरवठा, आरोग्य आणि तंत्रज्ञानातील समानता यावर मुद्दे पुढे नेण्याची संधी मिळेल.
• संयुक्त राष्ट्रसंघ, IMF, World Bank आणि WTO सारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची मागणी बळकट करता येईल.
• विकसनशील देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे मांडता येईल.
ब्रिक्स म्हणजे काय ?
What is BRICS ?
• BRICS - Brazil 🇧🇷, Russia 🇷🇺, India 🇮🇳, China 🇨🇳, and South Africa 🇿🇦
• ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या समूहाचा संदर्भ देणारा हा शब्द वापरला जातो.
• ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जिम ओ' नील यांनी 2001 मध्ये प्रथमच 'BRIC' हे संक्षिप्त रूप तयार केले.
• 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन या देशातील परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत BRIC या गटाला औपचारिकता देण्यात आली होती.
• 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 5 वा देश म्हणून या गटात समावेश झाला आणि BRIC चे नाव बदलून BRICS - (Brazil, Russia, India, China, and South Africa) असे करण्यात आले.
ब्रिक्स संघटना स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय आहे ?
• आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे. हे ब्रिक्स संघटनेचे उद्दिष्ट आहे.
BRICS संघटनेमध्ये कोण- कोणते सदस्य देश आहे ?
• 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन हे सदस्य देश होते.
• 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका 5 वा देश म्हणून या संघटनेमध्ये सामील झाली.
• 2024 पर्यंत इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या गटात सामील झाले.
• 2025 मध्ये इंडोनेशिया अधिकृतपणे BRICS गटात 10 वा सदस्य देश म्हणून सामील झाला.
न्यू डेव्हलपमेंट बँक (New Development Bank) कोणत्या संघटनेने स्थापन केली ?
• 2014 मध्ये BRICS संघटनेने न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) ची स्थापना केली.
• या बँकचे भांडवल $100 अब्ज आहे.
• BRICS आणि इतर विकसनशील राष्ट्रांमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी न्यू डेव्हलपमेंट बँक, निधी (Funding) पुरवते.
• मुख्यालय : शांघाय, चीन.















