
चालू घडामोडी | महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड सहा-पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी

Greenfield Six-Lane access-controlled highway project approved in Maharashtra
Subject : GS - सरकारी योजना - महाराष्ट्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) महाराष्ट्रात कोणत्या ग्रीनफिल्ड सहा-पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे ?
1. पुणे–नाशिक एक्सप्रेसवे
2. नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्ग
3. नाशिक–सोलापूर–अक्कलकोट कॉरिडॉर
4. मुंबई–नागपूर समृद्धी महामार्ग
उत्तर : नाशिक–सोलापूर–अक्कलकोट कॉरिडॉर (Nashik-Solapur-Akkalkot Corridor)
बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती (CCEA) ने महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक–सोलापूर–अक्कलकोट महामार्ग बांधण्यास मंजुरी दिली आहे.

हा प्रकल्प काय आहे ?
• हा एक नवीन (ग्रीनफिल्ड) सहा-पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग प्रकल्प आहे.
• तो नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर या महत्त्वाच्या शहरांना जोडेल आणि पुढे कुर्नूल दिशेने संपर्क मजबूत करेल.
• हा प्रकल्प पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखडा (PM Gati Shakti National Master Plan) या धोरणाअंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे.
• हा प्रकल्प ₹19,142 कोटींच्या भांडवली खर्चाने बांधा–वापरा–हस्तांतरित करा(Build–Operate–Transfer) तत्त्वावर राबवला जाणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये :
• या महामार्गाची लांबी 374 कि.मी. असेल आणि तो सहा पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड स्वरूपाचा असेल.
• या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 17 तासांनी कमी
• आणि प्रवासाचे अंतर सुमारे 201 कि.मी. ने घटेल.
• हा मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट व जलद दळणवळण उपलब्ध करून देईल.
प्रकल्पाचे आर्थिक व धोरणात्मक महत्त्व :
• या महामार्गामुळे वाहतूक क्षमता आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.
• औद्योगिक कॉरिडॉरशी संबंधित मालवाहतुकीस गती मिळेल.
• यामुळे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
• तसेच वाहतूक कोंडी, प्रवासाचा खर्च आणि अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल.
रोजगार निर्मिती :
• या प्रकल्पातून सुमारे 251.06 लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि
• 313.83 लाख मनुष्य-दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
• मार्गालगतच्या परिसरात आर्थिक घडामोडी वाढल्यामुळे अतिरिक्त रोजगार संधीही निर्माण होतील.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• प्रकल्प : नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर
• लांबी : 374 कि.मी.
• खर्च : ₹19,142 कोटी
• तत्त्व : BOT (Build–Operate–Transfer)















