
चालू घडामोडी | इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना

Electronics Component Manufacturing Scheme
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना (Electronics Components Manufacturing Scheme) अंतर्गत 22 अतिरिक्त प्रकल्पांना मंजुरी देणारे केंद्र सरकारचे मंत्रालय कोणते ?
1. वाणिज्य व उद्योग मंत्रालय
2. अवजड उद्योग मंत्रालय
3. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
4. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
उत्तर : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बातमी काय ?
• केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) ने इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजने अंतर्गत 22 अतिरिक्त प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
• या प्रकल्पांमधून सुमारे ₹41,863 कोटींची गुंतवणूक होणार असून
• भारतामधील इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजना म्हणजे काय ?
What is Electronics Components Manufacturing Scheme ?
• ECMS ही केंद्र सरकारची एक प्रमुख प्रोत्साहन योजना आहे.
• या योजनेचा उद्देश भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक घटक, सब-असेंब्ली आणि भांडवली उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन वाढवणे
• इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आयात अवलंबित्व कमी करणे हा आहे.
• मंत्रालय : ही योजना थेट इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत (Ministry of Electronics and Information Technology -MeitY) राबवली जाते.

या योजनेची पार्श्वभूमी व कालावधी :
• ECMS योजनेला 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
• या योजनेसाठी एकूण ₹22,919 कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे.
• योजनेअंतर्गत टर्नओव्हर-आधारित प्रोत्साहनासाठी ६ वर्षांचा कालावधी (त्यात १ वर्षाची तयारी कालावधी)
• आणि भांडवली गुंतवणूक (Capex) प्रोत्साहनासाठी ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
योजनेत प्रामुख्याने :
• PCB, कॅमेरा मॉड्यूल्स, कॉपर-क्लॅड लॅमिनेट्स, पॉलीप्रॉपिलीन फिल्म्स आणि इलेक्ट्रॉनिक्स भांडवली उपकरणे या घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
प्रोत्साहनाची रक्कम :
• उत्पादनातील वाढ आणि रोजगार निर्मितीशी थेट जोडलेली आहे,
• ज्यामुळे लवकर गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना अधिक फायदा मिळतो.
धोरणात्मक उद्दिष्टे काय आहेत ?
• इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेद्वारे -
• कॉपर-क्लॅड लॅमिनेट्ससाठी 100% देशांतर्गत मागणी पूर्ण करणे,
• त्याचबरोबर PCB साठी 20%, आणि कॅमेरा मॉड्यूल्ससाठी 15% देशांतर्गत मागणी पूर्ण करणे अपेक्षित आहे.
• यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
• या योजनेद्वारे देशांतर्गत मागणीचा मोठा भाग स्वदेशीच्या माध्यमातून पूर्ण करता येईल.
या निर्णयाचे महत्त्व (Significance) :
• इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजने मुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स मूल्यसाखळीतील सर्वात कमकुवत दुवा असलेल्या घटक उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.
• यामुळे देशांतर्गत मूल्यवर्धन (Domestic Value Addition) वाढेल
• आणि भारताचे जागतिक मूल्य साखळी (Global Value Chains) मधील एकत्रीकरण अधिक मजबूत होईल.
• या योजनेतून सुमारे 91,600 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे,
• तसेच देशांतर्गत संशोधन व विकास (R&D) क्षमतेलाही चालना मिळेल.






















