
चालू घडामोडी | डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन

Dr Madhav Gadgil Passes Away
Subject : GS - दिनविशेष - व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पश्चिम घाट पर्यावरण जैवविविधता समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
1. एल. एम. सिंघवी
2. डॉ. माधव गाडगीळ
3. डॉ. सी. रंगराजन
4. यांपैकी नाही
उत्तर : डॉ. माधव गाडगीळ
• एल. एम. सिंघवी समिती - पंचायती राज संस्था संदर्भात
• माधव गाडगीळ समिती - पश्चिम घाट पर्यावरण जैवविविधता संदर्भात
• डॉ. सी. रंगराजन समिती - दारिद्र्य निर्मूलन संदर्भात

बातमी काय ?
• ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, संशोधक आणि 'गाडगीळ समिती'चे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांचे 7 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यात अल्पशा आजारामुळे निधन झाले.
• डॉ. माधव गाडगीळ यांनी पंतप्रधानांची वैज्ञानिक सल्लागार परिषद, राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलं.
डॉ. माधव गाडगीळ यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डॉ. माधव गाडगीळ हे भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, लेखक आणि सेंटर फॉर इकोलॉजी सायन्सचे संस्थापक आहेत.
• डॉ. माधव गाडगीळ हे जगातील प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञांपैकी एक आहेत.
• त्यांनी वनस्पती, पाणी, पशू-पक्षी, निसर्ग आणि मानवाचे संबंध, निसर्गात मानवाचा हस्तक्षेप याबाबत अभ्यास करून महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
• त्यांना भारतातील पहिले बायोस्फीअर रिझर्व्ह, निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्ह याच्या स्थापनेचे श्रेय दिले जाते.
• 1986 ते 1990 या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते.

सरकारने गाडगीळ आयोगाची स्थापन कशासाठी केली होती ?
• पश्चिम घाटाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशावर हवामान बदल, विकास आणि लोकसंख्येचा परिणाम यांचे मूल्यांकन आणि विश्लेषण करण्यासाठी सरकारने "पश्चिम घाट पर्यावरण जैवविविधता समिती" स्थापन केली होती.
• पश्चिम घाट पर्यावरण जैवविविधता समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ हे होते.
• त्यांच्या नावावरून या आयोगास " गाडगीळ आयोग " म्हणून ही ओळखले जाते.
डॉ. माधव गाडगीळ यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी परीक्षेसाठी महत्त्वाचे पुरस्कार :
• भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार
• कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
• संयुक्त राष्ट्राचा " चॅम्पियन्स ऑफ द अर्थ " पुरस्कार
• जीवशास्त्रांसाठीचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
• विक्रम साराभाई पुरस्कार
• ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार
• पर्यावरणशास्त्रात केलेल्या कामगिरीसाठी सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा सन 2015 चा टायलर पुरस्कार






_1769824977764.webp)













